केस कितीही लांब आणि सुंदर असले तरी, त्यांना फाटे फुटायला लागले की त्यांची सारी चमक नाहीशी होते. केसांना फाटे फुटणे ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे केस लवकर तुटतात, निस्तेज, रुक्ष दिसतात आणि त्यांची वाढ खुंटते. केसांना फाटे फुटण्याची समस्या आपल्यापैकी बऱ्याचजणींना सतावते. केसांची टोकं कोरडी पडून फाटे तयार होतात...केसांना एकदा का फाटे फुटले की अशा केसांची वेळीच योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा केसांचे सौंदर्य हरवते आणि केसांचे मोठे नुकसान होते. केसांना फुटलेले हे फाटे केसांच्या मुळांपर्यंत नुकसान पोहोचवतात आणि केस निस्तेज व कमकुवत दिसतात(home remedies for split ends).
केसांच्या टोकांना फाटे फुटल्याने ते कितीही लांब वाढवले तरी नीट दिसत नाहीत. अशावेळी महागडे हेअर ट्रीटमेंट किंवा सरळ पार्लरमध्ये जाऊन आपण केस कापतो; परंतु आपण घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थांचा (natural remedies for split ends) वापर करुन केसांना फुटलेले फाटे कमी करु शकतो. नैसर्गिक घटकांचा वापर करून केसांना फुटलेले फाटे कसे कमी करायचे आणि केसांची नैसर्गिक चमक व मऊपणा कसा परत आणायचा, यासाठीचे खास घरगुती उपाय पाहूयात...
केसांना फाटे फुटले असतील तर करावेत असे घरगुती उपाय...
१. ऑलिव्ह ऑईल आणि मध (Olive Oil and Honey) :- केसांना फाटे फुटण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) आणि मध (Honey) समप्रमाणात घेऊन मिक्स करा आणि केसांना लावा. यामुळे केसांना ओलावा मिळतो, केस निरोगी होतात आणि त्यांची हरवलेली चमक परत येते. मधात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे खराब झालेले केस पुन्हा पहिल्यासारखे व चमकदार दिसतात.
आलिया भट्टचा नवा लूक, लुंगी-कुर्ता ड्रेसचा नवा फॅशन ट्रेंड! घालून पाहा, दिसाल अतिशय सुंदर...
२. नारळाचे तेल (Coconut Oil) :- केसांसाठी नारळाचे तेल खूपच फायदेशीर मानले जाते. केसांना खोबरेल तेल लावल्याने केसांना हायड्रेशन मिळते आणि केस तुटण्याचे प्रमाणही खूप कमी होते. फाटे फुटलेल्या केसांची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही रात्रभर केसांना नारळाचे तेल लावून ठेवू शकता. यामुळे केस चमकदार देखील होतात. हा घरगुती उपाय नियमितपणे केल्यास तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल.
३. कोरफड जेल (Aloe Vera Gel) :- त्वचेसोबतच कोरफड जेल केसांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. फाटे फुटलेल्या केसांचे प्रमाण कमी करण्यासाठी ताजे कोरफड जेल केसांना लावा आणि सुमारे ३० मिनिटांनी केस धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा करु शकता.
केसांतील डँड्रफ आणि खाज होईल गायब! ब्राह्मी तेलाचा असरदार उपाय - केस होतील लांबसडक, चमकदार...
४. दही आणि लिंबू (Curd and Lemon) :- दही आणि लिंबामध्ये असलेले अॅसिड आणि पोषक घटक केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. यासाठी दही आणि लिंबू मिक्स करून एकत्रित पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केसांचा pH लेव्हल संतुलित राहतो आणि फाटे फुटलेले केस निरोगी होतात.
५. मुलतानी माती आणि गुलाबजल (Multani Mitti and Rose Water) :- मुलतानी माती आणि गुलाबजल एकत्र करून पेस्ट तयार करा आणि ती सुमारे २० मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. यामुळे स्काल्पवरील घाण निघून जाते आणि केस मऊ व चमकदार होतात.
