Join us  

चेहरा चमकदार पण हात- पाय खूप काळे पडले? बघा टॅनिंग कमी करण्याचा १ सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 9:13 AM

Home Remedies For Reducing Tanning: हातापायांवर झालेलं टॅनिंग कमी कमी करण्यासाठी बघा हा एक सोपा उपाय... त्वचा स्वच्छ होऊन छान चमकेल. (how to remove dead skin from hands and legs?)

ठळक मुद्देहा उपाय आठवड्यातून २ ते ३ दिवस नियमितपणे करा. त्वचेवरचं टॅनिंग कमी होईल, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा छान स्वच्छ, चमकदार होईल. 

बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं की चेहरा छान चमकदार, उजळ असतो. पण हात- पाय मात्र काळे पडलेले असतात. खूप जास्त टॅन झालेले असतात. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपण आपल्या चेहऱ्याची जेवढी काळजी घेतो, तेवढी हाता-पायाच्या त्वचेची घेत नाही. उन्हात बाहेर जाताना चेहरा पुर्णपणे झाकलेला असतो, पण हात मात्र उघडेच असतात. तसेच वेगवेगळे सौंदर्योपचार आपण चेहऱ्यावर करून पाहातो, पण हात आणि पायांच्या त्वचेकडे मात्र दुर्लक्ष करतो (How to get rid of tanned skin?). त्यामुळे त्या भागावरचं टॅनिंग दिवसेंदिवस वाढत जातं (Home remedies for reducing tanning). म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा आणि हातापायांवर झालेलं टॅनिंग काढून टाका.(how to remove dead skin from hands and legs?)

हात- पाय काळवंडले असतील तर घरगुती उपाय

 

हात- पाय काळवंडले असतील, त्यांच्यावर खूप जास्त टॅनिंग झालं असेल तर त्यावर कोणता घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती anamikaversatile या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. हातापायांप्रमाणेच चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता.फेशियल केल्यानं चेहऱ्यावर आलेला ग्लो जास्त दिवस टिकण्यासाठी ४ टिप्स, चेहरा चमकेल सतत

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मसूर डाळ लागणार आहे. यासाठी २ ते ३ टेबलस्पून मसूर डाळ ४ ते ५ तास पाण्यात भिजत घाला आणि नंतर ती मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या. मसूर डाळीचं पीठ तुमच्याकडे असेल तर अधिक चांगलं. मग डाळ भिजत घालून तिची पेस्ट करण्याची गरज नाही.

 

आता मसूर डाळीच्या पेस्टमध्ये चिमूटभर हळद, अर्ध्या लिंबाचा रस आणि १ टेबलस्पून मध टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि तुमच्या हातापायांवर लावून ३ ते ४ मिनिटे मसाज करा.

वजन कमी करण्यासाठी हे पाहा कोरफडीचे ५ जबरदस्त फायदे, कोरफडीसारखा असरदार इलाज नाही

यानंतर ८ ते १० मिनिटे हा लेप तुमच्या चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर पाण्याने धुवून टाका. किंवा लेप अर्धवट सुकल्यानंतर तुम्ही तो हळूवार हाताने चोळूनही काढू शकता.

हा उपाय आठवड्यातून २ ते ३ दिवस नियमितपणे करा. त्वचेवरचं टॅनिंग कमी होईल, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा छान स्वच्छ, चमकदार होईल. 

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी