केसांच विरळ होणं, केस गळणं, केसात कोंडा होणे यांसारख्या अनेक समस्यांना आपल्यापैकी अनेकांना सामोरे जावे लागते. काळेभोर -लांबसडक केस आपल्यालापैकी अनेकांना आवडतात.(Home remedies for long and thick hair) केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण केसांसाठी अनेक उपाय करतो. परंतु, या समस्या कमी होण्याऐवजी त्या अधिकच वाढतात. (Homemade hair spray for hair growth)
वाढता तणाव, प्रदूषण आणि केसांसाठी वापरले जाणारे रासायनिक घटक त्याचे नुकसान करतात.(Fenugreek water for hair fall control) यामुळे केसांची वाढ होण्याऐवजी ती खुंटते.(Natural spray to stop dandruff and hair fall) केस अकाली पांढरे होतात, त्यांची चमक हरवते.(hair growth spray with 2 ingredient) केसांची समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. परंतु स्वयंपाकघरात आढळणारे मेथीचे दाणे केसांसाठी फार उपयुक्त आहेत.
कोरडी त्वचा, केसांचं वाटोळं झालं? रोज सकाळी प्या खास ड्रिंक, केसांसह चेहऱ्याच्या सौंदर्यात होईल वाढ
मेथीच्या दाण्याच्या केसांसाठी विविध प्रकारे फायदा होतो. यामध्ये प्रथिने , व्हिटॅमिन सी सारखे घटक आहेत. जे आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतात. ज्यामुळे केसांची वाढ होऊन केस अधिक मजबूत होतात. याची पेस्ट करुन केसांना लावल्याने केसातील कोंडा कमी होतो. यात असणारे नैसर्गिक तेल केसांना चमक देते. केसांच्या वाढीसाठी आपण मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून रोझमेरी आणि कढीपत्त्याची पाने घालून त्याचा स्प्रे तयार करु शकतो.
हेअर ग्रोथ स्प्रे तयार करण्यासाठी आपण एका बाऊलमध्ये मेथीचे दाणे, रोझमेरी आणि कढीपत्ता घालून पाणी चांगली उकळून घ्या. पाणी गाळून थंड झाल्यानंतर स्प्रेच्या बाटलीत भरा. या पाण्याच्या स्प्रे सकाळी केसांवर करा. दिवसातून एक वेळा हा स्प्रे केसांच्या मुळाशी मारल्याने केस लांबसडक आणि दाट होण्यास मदत होईल.
रोझमेरी आणि कढीपत्त्यामुळे केसांची वाढ होते. तसेच केस गळायचे देखील थांबतात. केसांचे अकाली पांढरे होणे देखील कमी करते. यामध्ये केसांची वाढ लवकर होण्याचे घटक असतात. केसांची मुळे मजबूत होऊन टाळूवरील कोंडा कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे.