ऋतू कोणताही असला तरी केसगळतीच्या समस्या या सुरुच राहातात. केस गळू लागले की, आपल्याला अधिक टेन्शन येते.(Natural Remedies for Hair Loss Prevention) आता टक्कलच पडते की, काय? असं देखील आपल्याला वाटू लागतं. जगभरात सध्या केसगळतीमुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकजण त्रस्त आहेत.(Drink This Herbal Drink to Reduce Hair Loss:) केसगळतीच्या समस्या रोखण्यासाठी आपण अनेक महागातले तेल, शाम्पू आणि इतर उत्पादनांचा वापर करतो. परंतु, केसगळती काही थांबायचे नाव घेत नाही. (Boost Hair Growth with Amla and Ginger Drink)
अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहारात बदलही करतो.(Home Remedy for Hair Growth) केसगळतीचे मुख्य कारण आपला आहार, व्हिटॅमिन्सची कमतरता, सतत स्ट्रेस घेणं किंवा वेळेवर झोप न घेणे हे असू शकते. वाढत्या धुळी आणि प्रदूषणाचा आपल्या केसांवर जास्त परिणाम होतो.(How to Stop Hair Loss in 7 Days Naturally) त्यामुळे केसांत कोंडा होणे, घाम साचणे, केस कोरडे पडण्यासह कसगळतीची समस्या सुरु होते.
आपल्यालाही केसगळतीच्या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत असेल तर आहारात काही बदल करायला हवा. रोज सकाळी कोमट पाण्यात मिसळून हा पदार्थ प्यायल्याने आपल्या संपूर्ण आरोग्याला फायदा होईल. निसर्गाच्या खनिज्यांपैकी बहुगुणी असलेले आवळा, कडीपत्ता आणि आले हे तिन्ही घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सि़डंट्सने समृद्ध आहे तर कडीपत्ता आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आले आपल्याला अन्न पचनास मदत करते. यामध्ये असणारे घटक आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. त्यासाठी हा एक क्यूब कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने सात दिवसात केसगळती कमी होण्यास मदत होईल.
साहित्य
आवळा - १० ते १२
कडीपत्ता - १५ ते २० पाने
आले - २ तुकडे
कृती
1. सगळ्यात आधी आले आणि आवळ्याचे बारीक तुकडे करा. त्यात कढीपत्ता आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा.
2. चाळणीमध्ये कापड ठेवून त्यात तयार पेस्ट घाला. कपडा चांगला पिळून घ्या, ज्यामुळे रस निघेल. उरलेली पेस्ट वाटून ती खाऊ शकतो किंवा त्याचा हेअर पॅक बनवू शकतो.
3. आता रस आइस ट्रे मध्ये घेऊन फ्रिजरमध्ये सेट होण्यास ठेवा. रोज सकाळी यातला एक क्यूब ग्लासात घेऊन त्यात कोमट पाणी घाला.
4. रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने केसगळतीची समस्या कमी होईल. तसेच यामध्ये असे अनेक घटक आहेत जे आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवतील.