Join us

कडूनिंबाची पानं आणि कोरफडीचा गर, गरबा खेळायला जाताना केस सिल्की हवेत तर करा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2023 15:35 IST

Home made natural Hair mask for Silky and shiny hairs : केसांचा पोत तर सुधारतोच पण केसांची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

नवरात्रीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात देवीची आराधना करताना आपण घरोघरी हळदी कुंकवासाठी, आरतीसाठी किंवा भोंडला नाहीतर गरबा खेळण्यासाठीही जातो. अशावेळी आपण मस्त तयार होतो. पण अशावेळी आपले केस खूप कोरडे किंवा रुक्ष असतील तर मात्र आपला सगळा मूडच ऑफ होतो. केस नेहमी छान सिल्की आणि शायनी दिसावेत असे प्रत्येकीलाच वाटते. पण शरीराला अन्नातून मिळणारे पोषण, प्रदूषण, केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर यामुळे केसांचा पोत खराब होतो (Home made natural Hair mask for Silky and shiny hairs). 

एकदा हा पोत खराब झाला की तो पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्याला बरेच कष्ट घ्यावे लागतात. मग कधी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस घेऊन तर कधी बाजारात मिळणारी विविध ब्रँडची उत्पादने वापरुन आपण केस तात्पुरते चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करतो. पण याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. त्यापेक्षा नेहमीसाठी केस सिल्की आणि मुलायम दिसावेत असे वाटत असेल तर घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन हेअर मास्क तयार करायला हवा. त्यामुळे केसांचा पोत तर सुधारतोच पण केसांची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. 

हेअरमास्क तयार करण्याची पद्धत...

१. एका मिक्सरच्या भांड्यात २ ते ३ जास्वंदाची फुलं, ४ ते ५ जास्वंदीच्या झाडाची पानं घ्या.

(Image : Google )

२. त्यामध्ये १२ ते १५ कडुलिंबाची पानं आणि साधारण २ चमचे कोरफडीचा गर घाला. 

३. हे सगळे मिक्सरमध्ये चांगले बारीक करुन घ्या.

४. एकजीव झालेले हे काळपट रंगाचे मिश्रण केसांच्या मुळांशी आणि केसांवरही एकसारखे लावा. 

५. साधारण १ तास हा मास्क केसांवर ठेवून नंतर हलक्या शाम्पू आणि कंडीशनरने केस धुवा. 

हेअर मास्कचे फायदे...

१. केस वाढण्यास मदत

२. केस पांढरे होण्यापासून बचाव

३. केसगळती रोखण्यास फायदेशीर 

४. केसांचा पोत मुलायम होण्यासाठी उपयुक्त 

५. कोंडा कमी होतो

६. केसांच्या मूळांची वाढ चांगली होते

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी