कधी कधी आपल्याकडून केसांची पुरेशी काळजी घेणं होत नाही. तेल योग्य प्रमाणात लावलं जात नाही. केसांवर वारंवार शाम्पूचा मारा केला जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मग केसांमधलं नॅचरल मॉईश्चर कमी होऊन केस कोरडे व्हायला सुरुवात होते. असे ड्राय आणि एकमेकांमध्ये गुंतलेले केस आपलं सौंदर्य कमी करतात. केस मऊ करण्यासाठी मग विकतच्या कंडिशनरचा वापर केला जातो (Use Of Banana Hair Mask For Silky And Shiny Hair). पण हा केमिकलयुक्त उपाय करण्याऐवजी केळी घेऊन एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (home made hair mask for silky and shiny hair). केळीमधलं पोटॅशियम केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांच्यावर छान चमक आणण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं.(home remedies to get rid of dry and dull hair)
केस मऊ, सिल्की होण्यासाठी केळीचा हेअर मास्क
केस मऊ आणि सिल्की होण्यासाठी घरच्याघरी हेअरमास्क कसा तयार करायचा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ ब्यूटी एक्सपर्टने drmanojdasjaipur या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
राखीपौर्णिमेला १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या पार्टीवेअर डिझायनर साडी, पाहा २ आकर्षक पर्याय
हा उपाय करण्यासाठी १ मध्यम आकाराचं केळ घ्या. ते केळ जेवढं जास्त पिकलेलं असेल तेवढं उत्तम. कारण पिकलेल्या केळीमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असतं आणि ते केसांसाठी जास्त पोषक ठरतं.
आता पिकलेलं केळ व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यामध्ये २ चमचे ॲलोव्हेरा जेल आणि २ चमचे मध घाला.
हे तिन्ही पदार्थ मिक्सरमधून फिरवून त्याची अगदी बारीक पेस्ट करून घ्या. आता या हेअरमास्कचा वापर केसांसाठी कसा करायचा ते पाहूया..
मुलांच्या बौद्धिक- शारिरीक विकासासाठी ३ फळं अतिशय महत्त्वाची, रोज खाऊ घाला- मुलं होतील धडधाकट
तयार केलेला हेअरमास्क केसांना लावण्याआधी केस शाम्पू करून स्वच्छ धुवून घ्या. यानंतर केसांना केळीचा हेअरमास्क लावा. तो केसांवर एखाद्या तासासाठी तसाच राहू द्या आणि त्यानंतर मग पुन्हा हलका शाम्पू वापरून केस धुवा. केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल आणि ते सिल्की, मऊ होतील. काही दिवस नियमितपणे आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहा.