Lokmat Sakhi >Beauty > काळ्या केसांसाठी भारती सिंगचा सोपा उपाय, कॉफीमध्ये २ पदार्थ मिसळून लावते-पांढरे केस गायब

काळ्या केसांसाठी भारती सिंगचा सोपा उपाय, कॉफीमध्ये २ पदार्थ मिसळून लावते-पांढरे केस गायब

How To Get Rid Of Gray Hair Naturally: पांढरे केस लपविण्यासाठी अभिनेत्री भारती सिंग बघा कोणता सोपा घरगुती उपाय करते...(home made hair mask by Bharati Singh for naturally black hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 18:01 IST2025-08-12T17:46:01+5:302025-08-12T18:01:21+5:30

How To Get Rid Of Gray Hair Naturally: पांढरे केस लपविण्यासाठी अभिनेत्री भारती सिंग बघा कोणता सोपा घरगुती उपाय करते...(home made hair mask by Bharati Singh for naturally black hair)

home made hair mask by Bharati Singh for naturally black hair, how to get rid of gray hair naturally  | काळ्या केसांसाठी भारती सिंगचा सोपा उपाय, कॉफीमध्ये २ पदार्थ मिसळून लावते-पांढरे केस गायब

काळ्या केसांसाठी भारती सिंगचा सोपा उपाय, कॉफीमध्ये २ पदार्थ मिसळून लावते-पांढरे केस गायब

Highlightsआठवड्यातून दोन वेळा तरी काही महिने हा उपाय नियमितपणे करा. हा उपाय केल्यामुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होईल.

पांढऱ्या केसांचं टेन्शन हल्ली बहुतांश लोकांना छळत आहे. अगदी कमी वयातच केस पांढरे होत आहेत. त्यामुळे ते लपविण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. केसांना मेहेंदी लावणं हा त्यावरचा एक चांगला उपाय आहे. पण तो खूप किचकट आणि वेळखाऊ असल्याने अनेकांना पटत नाही. शिवाय केमिकलयुक्त हेअर कलर लावणेही अनेकांना मान्य नाही. म्हणूनच आता पांढरे होत जाणारे केस काळे कसे करावे, हा प्रश्न पडत असेल तर अभिनेत्री भारती सिंग ने सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा (How To Get Rid Of Gray Hair Naturally?). हा हेअरमास्क लावल्याने केस लवकर पांढरे होेत नाहीत, असं तिचं म्हणणं आहे.(home made hair mask by Bharati Singh for naturally black hair)

 

केस पांढरे होऊ नयेत म्हणून भारती सिंहचा खास उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारे पदार्थच वापरायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी घ्या. त्या वाटीमध्ये २ चमचे कॉफी पावडर, १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा मध आणि २ चमचे दही घाला.

स्ट्रेटनिंग करताना 'या' चुका कराल तर केस गळणारच.. आलिया भटच्या हेअर स्टायलिस्टचा महत्वाचा सल्ला 

आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि हा लेप केसांच्या मुळांपासून ते शेवटच्या टोकापर्यंत सगळ्या केसांना व्यवस्थित लावा. केसांची लांबी पाहून तुम्ही या मास्कमध्ये वापरण्यात आलेल्या पदार्थांचं प्रमाण कमी- जास्त करू शकता.

 

आता हा लेप तुमच्या केसांवर १ ते दिड तास तसाच राहू द्या. त्यानंतर केस धुवून टाका. अगदी एकाच वापरात तुमच्या केसांमध्ये खूप काही फरक पडणार नाही. त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तरी काही महिने हा उपाय नियमितपणे करा. हा उपाय केल्यामुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होईल.

चांदीचे दागिने गरम तव्यावर टाका आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्खं चमकतील

तसेच मध, दही अशा पदार्थांमुळे केसांमधलं नॅचरल मॉईश्चर टिकून राहील आणि केस छान मऊसूत, सिल्की होतील. कॉफी पावडरमुळे केस भराभर वाढण्यास मदत होते. काही दिवस हा उपाय करून पाहा. 


 

Web Title: home made hair mask by Bharati Singh for naturally black hair, how to get rid of gray hair naturally 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.