घरच्याघरी तयार करा, चेहऱ्याला लावता येतील असे गारेगार फेसपॅक ! सोपेही आणि हेल्दीही - Marathi News | Home made face mask for moisturizing and cooling the face in dry summer weather | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > घरच्याघरी तयार करा, चेहऱ्याला लावता येतील असे गारेगार फेसपॅक ! सोपेही आणि हेल्दीही

घरच्याघरी तयार करा, चेहऱ्याला लावता येतील असे गारेगार फेसपॅक ! सोपेही आणि हेल्दीही

उन्हाळ्यात त्वचेकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा काळवंडण्यासोबतच त्वचा कोरडी पडून एजिंगची प्रकिया वेगानं घडते. त्वचा ओलसर असेल तरच ती चमकदार दिसते. त्यामुळे त्वचा ओलसर राहाण्यासाठी घरगुती लेप स्वरुपात उपाय करता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:46 PM2021-05-06T17:46:48+5:302021-05-07T11:59:58+5:30

उन्हाळ्यात त्वचेकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा काळवंडण्यासोबतच त्वचा कोरडी पडून एजिंगची प्रकिया वेगानं घडते. त्वचा ओलसर असेल तरच ती चमकदार दिसते. त्यामुळे त्वचा ओलसर राहाण्यासाठी घरगुती लेप स्वरुपात उपाय करता येतात.

Home made face mask for moisturizing and cooling the face in dry summer weather | घरच्याघरी तयार करा, चेहऱ्याला लावता येतील असे गारेगार फेसपॅक ! सोपेही आणि हेल्दीही

घरच्याघरी तयार करा, चेहऱ्याला लावता येतील असे गारेगार फेसपॅक ! सोपेही आणि हेल्दीही

Next
Highlightsबदाम आणि गुलाब पाण्याच्या लेपामुळे चेहेरा ताजातवाना दिसतो आणि त्वचाही चमकदार होते. पपईच्या लेपामुळे चेहेऱ्याची त्वचा ओलसर राहाते आणि त्वचेतलं मॉश्चरायझरही टिकून राहातं. कोरफड आणि मध एकत्र केल्यास त्याचा फायदा त्वचा ताजीतवानी आणि निरोगी होण्यास होतो.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही नियम पाळणं जसे गरजेचे असतात तसेच काही उपाय करणंही आवश्यक असतं. उन्हाळाच्या काळात त्वचेचं संरक्षण करणारे उपाय केले नाहीत तर त्वचा खराब होते. आणि हे परिणाम केवळ तात्पुरत्या स्वरुपाचे नसतात.  उन्हाळ्यात त्वचेकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा काळवंडण्यासोबतच त्वचा कोरडी पडून एजिंगची प्रकिया वेगानं घडते. त्वचा ओलसर असेल तरच ती चमकदार दिसते. त्यामुळे त्वचा ओलसर राहाण्यासाठी घरगुती लेप स्वरुपात उपाय करता येतात.

बदाम आणि गुलाब पाण्याचा लेप
 बदाम आणि गुलाब पाणी एकत्र केल्यास ते जास्त परिणामकारक ठरतं. हा मास्क तयार करण्यासाठी आठ ते दहा बदाम रात्रभर भिजत घालावेत. आणि सकाळी ते मिक्सरमधे अगदी बारीक वाटून घ्यावेत. बदामच्या पेस्टमधे थोडं गुलाब पाणी घालावं आणि ही पेस्ट चेहेऱ्यास लावावी. २० मीनिटानंतर कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. या लेपामुळे चेहेरा ताजातवाना दिसतो आणि त्वचाही चमकदार होते.

पपईचा लेप
पपईमुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होते. चेहेऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते सोबतच पपईत त्वचा तरुण ठेवण्याचे गुणधर्मही असतात. पपईचा लेप करण्यासाठी केवळ पपईचीच गरज असते. पपईच्या लेपामुळे चेहेऱ्याची त्वचा ओलसर रहाते आणि त्वचेतलं मॉश्चरायझरही टिकून राहातं. पपईचा लेप करण्यासाठी पिकलेल्या पपईचे छोटे तूकडे घ्यावेत . हे तूकडे कूस्करावेत. पपईची ही पेस्ट लगेच चेहेऱ्यास लावावी. पपईचे तूकडे कूस्करल्यानं ते पातळ होतात. त्यामूळे लेप चेहेऱ्यावर लावल्यानंतर तो गळणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी कापसाचे मोठे तुकडे पपईच्या लेपावर ठेवले तरी चालतात. १५ मीनिटानंतर लेप धुवून टाकावा.

ओटस आणि काकडीचा लेप
ओटस हे त्वचा मऊ करतं. काकडी ही त्वचेसाठी नैसर्गिक टोनरचं काम करते. शिवाय चेहेऱ्यास थंडावा देणारे गुणधर्मही काकडीत असतात. हा लेप तयार करण्यासाठी तीन छोटे चमचे ओटस आणि एक चमचा काकडीचा रस घ्यावा. त्यात एक चमचा दही घालावं.  सर्व जिन्नस नीट एकत्र करुन घ्यावं आणि लेप चेहेऱ्यास लावावा. लेप पूर्ण वाळू द्यावा. तो वाळला की चेहेरा गरम पाण्यानं धुवावा.

चंदन आणि गुलाबपाण्याचा लेप
 चंदन आणि गुलाबपाणी त्वचेसाठी फायदेशीर असतात. चंदन त्वचेस थंडावा देतो. चेहेऱ्यावर पडलेले डाग आणि काळसरपणा कमी करण्याचं काम चंदन करतं. तर गुलाबपाण्यात अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट, जीवाणूविरोधी, दाहविरोधी घटक असतात. शिवाय त्वचा तरुण राखण्यासही गुलाब पाणी मदत करतं. चंदन आणि गुलाबपाण्याचा लेप त्वचा ओलसर ठेवतो शिवाय त्वचेतलं मॉश्चरायझरही टिकवतो. चेहेऱ्यास ,मुरुमांनी येणारी खाज थांबण्यास त्याचा उपयोग होतो. तसेच पुटकुळ्याही जातात. हा लेप तयार करण्यासाठी तीन छोटे चमचे चंदन पावडर थोड्या गुलाब पाण्यात एकत्र करावी. हे मिश्रण लगेच चेहेऱ्यास लावावं. १५ मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

कोरफड आणि मधाचा लेप
कोरफडमधे त्वचेचं पोषण करणारे घटक आणि अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस असतात. त्यामुळेच कोरफड त्वचेचं सुरकुत्यांपासून संरक्षण करतं. शिवाय उन्हानं रापलेल्या, काळवंडलेल्या त्वचेसाठी कोरफड उत्तम उपाय आहे. मध त्वचेचा काळसरपणा, मुरुम, डाग घालवण्यासाठी उपयुक्त असतं. कोरफड आणि मध एकत्र केल्यास त्याचा फायदा त्वचा ताजीतवानी आणि निरोगी होण्यास होतो. हा लेप तयार करण्यासठी पाव कप कोरफडचा गर घ्यावा त्यात एक मोठा चमचा मध घालावं. हा लेप चेहेऱ्यास लावला की वीस मिनिटानंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.

Web Title: Home made face mask for moisturizing and cooling the face in dry summer weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.