सध्याच्या धावपळीच्या जगात प्रदूषण, धूळ आणि रासायनिक उत्पादनांमुळे केसांचे आरोग्य बिघडणे सामान्य झाले आहे. केस कोरडे पडणे, निर्जीव आणि झाडूसारखे दिसू लागले की आपल्याला सर्वात आधी आठवण येते ती पार्लरमधील महागड्या केराटिन किंवा हेअर स्मूथनिंग ट्रिटमेंटची.(Keratin treatment at Home) पण या ट्रिटमेंटसाठी हजारो रुपये मोजणं प्रत्येकाला परवडत नाही. तसेच त्यात असणारे केमिकल्समुळे काही काळानंतर केसांचे नुकसान होण्याची भीतीही असते. (Home remedies for dry and damaged hair)आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहे ज्याचा वापर करुन आपण १० रुपयांत पार्लरसारखा सिल्की लूक मिळवू शकता. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर केस अगदी सिल्की-मुलायम होण्यास मदत होते. पाहूयात ही ट्रीटमेंट घरच्या घरी कशी करायची. (Silky hair sathi gharguti upay)
जिम न लावता मिळेल 'झिरो फिगर' ! बेली फॅट लपवण्यासाठी ५ ट्रेंडी कॉर्सेट ब्लाउज; साडीत दिसाल सडपातळ
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या क्रीमरची गरज लागणार नाही. घरातील साध्या साहित्यातून हा मास्क तयार करता येईल.
शिजवलेला भात - अर्धी वाटी कोरफडीचा गर - २ चमचे नारळाचे तेल - १ चमचा कच्चे दूध - गरजेनुसार
1. सगळ्यात आधी आपल्याला शिजवलेला भात मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा लागेल. त्यात कोरफडीचा गर आणि नारळाचे तेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट घट्ट वाटल्यास थोडेसे कच्चे दूध मिसळा. ज्यामुळे केसांना व्यवस्थित लावता येईल.
2. केसांचा गुंता व्यवस्थित काढून घ्या. आता केसांचे छोटे छोटे भाग करुन हा मास्क मुळांपासून टोकापर्यंत नीट लावा. जसं पार्लरमध्ये केराटिन क्रीम लावतात अगदी तसेच.
3. हा मास्क केसांवर ४० ते ४५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर केस साध्या कोमट पाण्याने धुवा. आपले केस अधिक मऊ, सरळ आणि चमकदार दिसू लागतील.
4. भातामध्ये मोठ्या प्रमाणात अमीनो ॲसिड आणि कर्बोदके असतात, जे आपल्या केसांच्या तुटलेल्या पेशींचे दुरुस्तीचे काम करतात. कोरफड आणि नारळाचे तेल केसांना हायड्रेट ठेवतात, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो.
मास्कचे फायदे
घरच्या घरी हा उपाय केल्यास केसांचा कुरळेपणा कमी होतो. तसेच केस मऊ, मुलायम होतात. खराब झालेले आणि केमिकल्समुळे केसांचे नुकसान होते. या मास्कमुळे केस दुरुस्त होतात. केसांना मजबूत करण्यास मदत होते.
Web Summary : Rejuvenate damaged hair with a simple DIY hair spa. Using rice, aloe vera, and coconut oil, this ₹10 treatment promises salon-like results, leaving hair silky and strong.
Web Summary : चावल, एलोवेरा और नारियल तेल से घर पर हेयर स्पा करें। यह ₹10 का ट्रीटमेंट सैलून जैसा रिजल्ट देगा, जिससे बाल रेशमी और मजबूत बनेंगे।