Join us

केस गळाल्यामुळे भांग पसरट दिसतो, कपाळावरचे केसही गळाले? १ उपाय- नवे केस भराभर उगवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 16:29 IST

Home Hacks for The Growth of Baby Hair: केस गळण्याचे प्रमाण खूप वाढले असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा..(how to get rid of hair loss?)

ठळक मुद्देमहिनाभर हा उपाय नियमितपणे केल्यास खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

केस गळण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढलेली आहे. केसांची पुरेशी काळजी न घेतली जाणे आणि आहारातून केसांना पोषण न मिळणे ही त्यामागची काही प्रमुख कारणं असू शकतात असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. त्यामुळे आपल्या आहाराकडेही लक्ष दिलंच पाहिजे आणि त्यासोबतच काही घरगुती उपायही नियमितपणे केले पाहिजेत (Home Hacks for The Growth of Baby Hair). आता केसांचं गळणं कमी करून केस वाढण्यासाठी (home hacks to grow new hair) मदत करणारा एक सोपा उपाय पाहूया..(how to get rid of hair loss?)

 

केस गळाल्यामुळे भांग मोठा- पसरट झाला?

बहुतांश जणींना ही समस्या छळते. कित्येकजणी मधोमध किंवा डाव्या किंवा उजव्या बाजुला भांग पाडून केस मोकळे सोडतात किंवा हेअरस्टाईल करतात. पण हळूहळू असं लक्षात यायला लागतं की आपण रोज जो भांग पाडतो आहोत तो हळूहळू पसरट व्हायला सुरुवात झाली आहे.

सावधान! सणावाराला तुपातली भेसळ वाढते- तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा...

याचं कारण हेच की तिथले केस गळायला लागतात. शिवाय कपाळाच्यावर असणारे बारीक केसही गळून जातात आणि मग कपाळ खूपच मोठं दिसायला लागतं. काही जणांच्या बाबतीत तर असंही होतं की बेबी हेअर गळाल्यामुळे समोरच्या भागात टक्कल पडल्यासारखं वाटतं. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा..

 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी वाटीभर कोथिंबीर घ्या आणि ती स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये फिरवून तिचा रस काढा. हा रस जर साधारण अर्धी वाटी असेल तर त्यामध्ये दिड ते दोन चमचे आल्याचा रस घाला.

नवरात्रोत्सव २०२५: दांडियासाठी दागिने घ्यायचे? पाहा यंदा ट्रेण्डी असणारे ऑक्सिडाईज नेकलेसचे लेटेस्ट पॅटर्न

कोथिंबीरीचा रस आणि आल्याचा रस यामुळे डोक्याच्या त्वचेखालचा रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे केस गळणं कमी होऊन केसांची झटपट वाढ होण्यास मदत होते. आता त्यामध्ये दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. हा रस तुम्ही फ्रिजमध्येही ८ दिवस ठेवू शकता. या रसाने केस विरळ झालेल्या ठिकाणी रोज रात्री झोपण्यापुर्वी मालिश करा. सकाळी केसांचा फक्त तेवढाच भाग पाणी लावून धुवून टाका. महिनाभर हा उपाय नियमितपणे केल्यास खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी