हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की थंड, कोरड्या हवेचा परिणाम जसा आपल्या त्वचेवर होतो, तसाच तो आपल्या केसांवरही होतो. या दिवसांत स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचाही खूप काेरडी होते. त्यामुळे डोक्यात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. कोंडा वाढल्यामुळे केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. तसेच हिवाळ्यात केस देखील खूप कोरडे होतात (how to get rid of hair dryness?). केसांवरून हात फिरवल्यावर ते हातालाही अगदी रखरखीत लागतात (home hacks to get silky and shiny hair). केसांचा कोरडेपणा कमी करायचा असेल तर शाम्पू केल्यानंतर केसांना नियमितपणे कंडिशनर तर लावाच, पण पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपायही लगेच करून पाहा..(use of mustard oil for shiny and smooth hair)
कोरडे केस सिल्की, चमकदार होण्यासाठी मोहरीच्या तेलाचा उपाय
मोहरीचे तेल हे थोडे उष्ण असते. त्यामुळे ते हिवाळ्यात केसांसाठी अवश्य वापरले पाहिजे. कारण मोहरीचे तेल लावून डोक्याला मालिश केल्यास त्वचेखाली रक्ताभिसरण जास्त चांगले होते. त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळणेही कमी होते. आता यासोबतच केसांवर चमक येण्यासाठी मोहरीचं तेल कसं वापरायचं ते पाहूया..
बिनातेलाचा ब्रेड पकोडा, थेंबभर तेलाचीही गरज नाही- कोणताही गिल्ट मनात न ठेवता यथेच्छ ताव मारा
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घाला. त्यामध्ये २ ते ३ चमचे मोहरीचं तेल अर्धा चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा ॲलोव्हेरा जेल घाला.
हे सगळे पदार्थ २ ते ३ मिनिटे सतत चमच्याने किंवा व्हिस्कने हलवत राहा. सलग काही मिनिटे हलवल्यानंतर ते जेलीसारखं होईल.
आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते केसांच्या मुळांपासून ते त्यांच्या टोकापर्यंत सगळ्या केसांना व्यवस्थित लावा. यानंतर डोक्यामध्ये शॉवर कॅप घाला आणि साधारण अर्ध्या ते पाऊण तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केस खूप मऊ आणि सुळसुळीत झालेले दिसतील. हा उपाय काही दिवस आठवड्यातून एकदा करा. केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
Web Summary : Combat winter hair dryness with mustard oil! Apply a mixture of warm water, mustard oil, glycerin, and aloe vera gel to hair roots for silky, smooth results. Repeat weekly.
Web Summary : सर्दियों में रूखे बालों से सरसों के तेल से छुटकारा पाएं! गर्म पानी, सरसों का तेल, ग्लिसरीन और एलोवेरा जेल का मिश्रण बालों की जड़ों में लगाएं और रेशमी, मुलायम बाल पाएं। इसे हर हफ्ते दोहराएं।