Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई-आजीच्या स्वयंपाकघरातली पारंपरिक चटणी, रोज १ चमचा खा - केस होतील लांबसडक, दाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 15:59 IST

healthy chutney for hair problems : homemade chutney for hair growth : best ayurvedic food for hair growth : शाम्पू - तेल लावून थकलात? मग रोज जेवताना खा 'ही' एक चटणी; केसगळती थांबून वाढतील भरभर...

कित्येकदा वाढत्या वयातही आपल्या आई - आजीचे केस आणि त्या केसांच सौंदर्य पाहून आपल्यालाच आश्चर्य वाटतं. वय वाढलेलं असूनही याही वयातच त्यांचे केस घनदाट, लांबसडक, काळेभोर आणि खूपच सुंदर दिसतात. याउलट, आपले केस म्हणजेच खूपच पातळ, वाढ खुंटलेली आणि केसांशी संबंधित ढीगभर  समस्या...आपले केस देखील आपल्या आई - आजीप्रमाणेच घनदाट, लांबसडक, काळेभोर आणि सुंदर असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते पण केसांच्या अनेक समस्यांमुळे ते आपल्याला हवे तसेच नसतात. केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे तेल, शॅम्पू, हेअर मास्क आणि पार्लरमधील ट्रिटमेंट्सवर हजारो रुपये खर्च करतो. पण वरून कितीही गोष्टी लावल्या, तरी जोपर्यंत शरीराला आतून पोषण मिळत नाही, तोपर्यंत केसांच्या समस्या मुळापासून संपत नाहीत(healthy chutney for hair problems).

आपल्या आई-आजीच्या काळात आजच्यासारखी (homemade hair care chutney) महागडी ब्यूटी प्रॉडक्ट्स नव्हती, तरीही त्यांचे केस घनदाट, काळेभोर आणि मजबूत असायचे. याचं सर्वात मोठं सिक्रेट लपलं होतं त्यांच्या रोजच्या आहारात...आपल्या जुन्या जाणत्या सुवासिक आणि हेल्दी पदार्थांपासून तयार केलेली एक खास पारंपरिक चटणी केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकते. रोज जेवताना फक्त एक चमचा ही चटणी खाल्ल्याने केस गळणे तर थांबतेच, सोबतीने केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि केसांची वाढ दुप्पट (homemade chutney for hair growth) वेगाने होऊ लागते. केसांसाठी वरदान (best ayurvedic food for hair growth) ठरणाऱ्या 'या' जादूई चटणीची रेसिपी आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात. 

केसांच्या वाढीसाठी घरगुती - पौष्टिक आयुर्वेदिक चटणी... 

केसांच्या वाढीसाठी घरगुती - पौष्टिक आयुर्वेदिक चटणी तयार करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा आपण वापर करु शकतो. यात शेंगदाणे १/२ कप, भाजलेली चणा डाळ (डाळं) १/२ कप, धणे आणि जिरे १/२ कप, ओलं खोबरं (किसलेलं) १/२ कप, ताजी कडीपत्त्याची पाने १ कप, काळे तीळ २ मोठे चमचे, काळीमिरी पावडर १ मोठा चमचा, चिंच २ लहान तुकडे, २ सुक्या लाल मिरच्या, १ मोठा चमचा शेवग्याच्या पानाची पावडर, चवीनुसार मीठ, १ लहान चमचा खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.  

कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या एका गोष्टीमुळे गळणारे केस थांबतील! ना केमिकल, ना खर्च तरीही केस वाढतील भराभर...

साधेपणातही रॉयल रुबाब, पाहा १० कॉटन खण साड्या! परफेक्ट मॅच ब्लाऊजपिसही-लूक कमाल सुंदर...

चटणी कशी करायची ? 

१. सर्वात आधी एका कढईत १ लहान चमचा नारळाचे तेल गरम करा.
२. आता चिंच, शेवग्याच्या पानाची पावडर आणि मीठ वगळता सर्व साहित्य कढईत टाका आणि छान खमंग सुवास येईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या.
३. साहित्य व्यवस्थित भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि ते थोडे थंड होऊ द्या.
४. मिश्रण थोडे थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात काढा. त्यात चिंच, शेवग्याच्या पानाची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व गोष्टी व्यवस्थित वाटून घ्या (तुम्हाला हवी असल्यास ही चटणी थोडी जाडसर किंवा बारीक पावडरसारखी वाटू शकता).
५. तुमची केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि चवदार पारंपरिक चटणी खाण्यासाठी तयार आहे. 

ही चटणी आपण आपल्या रोजच्या आहारात सहज समाविष्ट करू शकता. रोज जेवताना १ ते २ चमचे चटणी चपाती, भात, डोसा किंवा कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. गरमागरम भातावर थोडे साजूक तूप आणि ही चटणी एकत्र करून खायला अधिक चविष्ट लागते. तुम्हीही हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून पाहा.

फक्त शाम्पू करण्यापूर्वी केसांना लावा 'हे' हर्बल पाणी! उन्हाळ्यात केस कोरडे - रुक्ष होण्याच्या प्रश्नच सुटेल कायमचा...

केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि सौंदर्यासाठी ही चटणी खाण्याचे फायदे... 

१. शेवग्याला आयुर्वेदात 'अमृत' मानले जाते. यात लोहाचे (Iron) आणि विटामिन-ए, सी चे प्रमाण भरपूर असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करते. कडीपत्त्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे केस गळणे पहिल्या आठवड्यापासूनच कमी होते.

२. शेंगदाणे आणि भाजलेल्या चणा डाळीमध्ये नैसर्गिक प्रोटीन आणि 'बायोटीन' असते. यामुळे केसांचा पातळपणा दूर होऊन केसांना चांगला वॉल्युम मिळतो आणि केस घनदाट होतात.

३. काळ्या तिळामध्ये असणारे ओमेगा फॅटी ॲसिड्स आणि मिनरल्स स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारतात. काळे तीळ केसांना मुळापासून पुन्हा काळेभोर आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

४. काळीमिरी आणि नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ही चटणी पोटात गेल्यावर रक्ताचे शुद्धीकरण करते, ज्यामुळे स्काल्पवर होणारे फंगल इन्फेक्शन, खाज आणि कोंड्याची समस्या मुळापासून नष्ट होते. धणे-जिरे शरीरातील उष्णता कमी करतात, कारण शरीरात जास्त उष्णता (पित्त) वाढल्यास देखील प्रचंड केस गळतात.

५. चिंच, जिरे आणि काळीमिरी उत्तम पाचक आहे. जेव्हा पचन नीट होते, तेव्हा अन्नातील सर्व पोषक घटक केसांना मिळतात. त्यामुळे केसांची वाढ अगदी दुप्पट वेगाने होऊ लागते.


English
हिंदी सारांश
Web Title : Grandma's Chutney: Eat 1 Spoon Daily for Long, Thick Hair!

Web Summary : This article highlights a traditional homemade chutney recipe for hair growth. It uses ingredients like peanuts, curry leaves, sesame seeds, and spices. Regular consumption is believed to strengthen hair roots, reduce hair fall, and promote healthy, shiny hair. The recipe and benefits are explained.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय