हरतालिकेचा उपवास, पुजा त्यासाठी तयार होणं हे सगळं बायकांसाठी खूप स्पेशल असतं. मैत्रिणी, शेजारपाजारच्या एकत्र येऊन पुजा करतात. या पुजेसाठी छान पारंपरिक पध्दतीनं तयार व्हायचं असतं. पण पारंपरिक पध्दतीनं तयार होताना साडी नेसणं आलंच. मग साडी घातल्यावर शोभून दिसेल असा मेकअपही हवा. पण धावपळीत मेकअपसाठी तेवढा वेळ कुठे असतो प्रत्येकीकडे. पण मग घाईघाईत तयार होताना मेकअप नीट होत नाही. पाहिजे तसा लूक मिळत नाही. सगळाच हिरमोड होतो. असं होवू नये काय कराल?तर मेकअप करा.. पण हे काही उत्तर झालं का? मेकअपसाठीच तर वेळ नाहीयेना? असा प्रश्न पडेल हे वाचून. उत्तर खरंतर बरोबरच आहे. कारण झटपट मेकअपच्या सोप्या टिप्सही आहेत त्या फक्त फॉलो करा. मनासारखा लूक नक्की जमेल!
हरतालिकेसाठी स्पेशल लूक
छायाचित्र- गुगल
1. पुजेसाठी पारंपरिक लूक हवा हे आधीच मनाशी ठरलेलं असतं. हातावर मेंदी काढा. आता झटपट रंगणार्या मेंदीचे कोनही बाजारात मिळतात. आपल्याला आवडेल ती डिझाइन किंवा मेंदी डिझाइनचा कोणता ट्रेण्ड आहे हे बघून तशी डिझाइन काढावी. तळहाताच्या मध्यमागी आणि बोटं यावर मेंदीचा रंग चढला तरी हात सुंदर दिसतो.सणावाराला नेलपेण्ट तर आपण न चुकता लावतोच.
2. मेकअप जरी झटपट करायचा असला तरी तो मेकअप चेहेर्यावर नीट लागण्यासाठी आणि दिवसभर चेहेरा छान फ्रेश दिसण्यासाठी मेकअपची पूर्वतयारी आवश्यक आहे. त्यासाठी खूप वेळ काढावा लागणार नाही. सर्वात आधी सौम्य क्लीन्जरनं, ते घरात नसल्यास कच्च्या दुधानं चेहेर्याचं क्लीन्जिंग करावं. क्लीन्जिंग नंतर टोनिंग करावं. त्यासाठी गुलाब पाणी वापरलं तरी चालतं. यामुळे त्वचा छान सेट होते. टोनिंगनंतर चेहेर्यावर रुमालात बर्फ घेऊन तो काही सेकंद फिरवावा. यामुळे चेहेर्याची त्वचा घट्ट होते आणि मेकअपही दीर्घकाळ टिकतो.
3. क्लीन्जिंग आणि टोनिंग नंतर चेहेर्याला मॉश्चरायझर अवश्य लावावं. कारण चेहेरा मॉश्चराइज झाला तरच चेहेर्यावर ओलसरपणा राहील. नाहीतर मॉश्चरायजर न लावता मेकअप केला तर थोड्या वेळातच चेहेरा कोरडा पडतो.
4. चेहेरा छान दिसण्यासाठी फाउंडेशन लावणं आवश्यक आहे. यामुळे चेहेर्याची त्वचा मऊ होते आणि मेकअप केल्यावर ती इव्हनही दिसते. म्हणजे कुठे मेकअप जास्त कुठे कमी अशी दिसत नाही.
5. फाउंडेशन लावल्यानंतर कन्सीलर लावणं आवश्यक आहे. यामुळे चेहेर्यावरचे डाग झाकले जातात. कन्सीलर लावताना ते डॉट-डॉट करुन लावावं आणि स्पंजने ते चेहेर्यावर पसरवावं. नंतर प्रायमर लावलं की लूक छान सेट होतो.यामुळे चेहेर्यावर खूप वेळ टिकून राहातो.
छायाचित्र- गुगल
6. डोळ्यांच्या बेसिक मेकअपनेही लूकला छान उठाव येतो. डोळ्यांच्या मेकअपसाठी आयशॅडो, काजळ आणि मस्कारा बसं एवढंच पुरे आहे. लिक्विड काजळा ऐवजी पेन्सिल काजळ वापरावं.
7. आपण ज्या रंगाची साडी घालणार आहोत त्याला मॅच होईल अशी लिपस्टिक लावावी. लिपस्टिक उठावदार दिसण्यासाठी ती लावण्याआधी लिप लाइनर लावावं.
एवढा मेकअप करायला बसं काही मिनिटं लागतात. पण त्यामुळेही हरतालिकेच्या पुजेसाठी हवा असणारा स्पेशल लूक मिळतो.