Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना कुठलं मशिन ना जेल, घरीच शून्य खर्चात करा केस कुरळे-पाहा कर्ली वेव्ही केसांसाठी खास ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2026 16:01 IST

Hair Style - Curl your hair at home at zero cost - see special trick for curly wavy hair : घरीच करा केस कुरळे. दिसतात सुंदर दिवसभर.

घरीच केस वेव्ही  किंवा कर्ली करण्याचा ट्रेंड सध्या खूप लोकप्रिय झाला आहे. पार्लरमध्ये जाऊन केमिकल ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धतीने हेअर स्टायलिंग करणे अधिक चांगले ठरते. (Hair Style -  Curl your hair at home at zero cost - see special trick for curly wavy hair)योग्य ट्रिक्स वापरल्या तर केसांना कोणताही त्रास न होता सुंदर वेव्ह्स आणि कर्ल्स सहज मिळू शकतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांना जास्त उष्णता (heat) देणारी साधनं टाळणं. घरी केसांची ट्रिटमेंट करायची म्हणजे विविध गॅडजेट्स वापरणंच असतं असं नाही. केसांसाठी ती चांगली नसतात.  रोज कर्लिंग मशीन वापरल्याने केस कोरडे, नाजूक होतात. तुटतात आणि खराब होतात.  त्यामुळे नो-हीट पद्धती वापरणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ओले केस वेणी घालून ठेवणे ही सर्वात सोपी आणि प्रभावी ट्रिक आहे. केस धुतल्यानंतर थोडेसे ओलसर असतानाच दोन किंवा चार वेण्या घालून ठेवा. काही तासांनी त्या सोडल्या की नैसर्गिक वेव्ही लूक मिळतो. केस किती कर्ली हवेत यावर वेण्यांची संख्या ठरवता येते. घट्ट वेणी घालायची. ही ट्रिक नक्की करुन पाहा. 

टी-शर्ट किंवा कापडी पट्टी वापरुनही सुंदर कर्ल्स करता येतात. केसांचे छोटे-छोटे भाग घेऊन ते कापडाभोवती गुंडाळून ठेवा आणि काही वेळाने सोडा. ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित असून केसांना कोणताही अपाय करत नाही. शिवाय खर्च नाही. हेडबँड स्टाइल देखील खूप सोपी आहे. केसांवर सॉफ्ट हेडबँड लावून त्यात केस गुंडाळून ठेवायचे. काही तासांनी सोडल्यावर हलके, सॉफ्ट कर्ल्स तयार होतात. रात्री करून झोपल्यास सकाळी छान लूक मिळतो. फक्त केस ताणले जाणार नाहीत आणि गुंता होणार नाही या पद्धतीने गुंडाळा. 

केसांमध्ये नैसर्गिक टेक्स्चर टिकवण्यासाठी अॅलोव्हेरा जेल लावणं फायदेशीर ठरतं. यामुळे केस मऊ राहतात आणि कर्ल्स अधिक व्यवस्थित दिसतात. मात्र जास्त प्रॉडक्ट वापरू नयेत, नाहीतर केस चिपचिपीत वाटू शकतात. केस कर्ली करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, केस पूर्णपणे ओले नसावेत आणि पूर्ण कोरडेही नसावेत. ओलसर केसांवर या पद्धती केल्यास परिणाम अधिक चांगला दिसतो. घरीच सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने केस वेवी किंवा कर्ली करणं अगदी शक्य आहे. कोणत्याही केमिकल किंवा हीटशिवाय सुंदर, नैसर्गिक कर्ल्स मिळवता येतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Zero-cost home hair curling: Simple tricks for wavy, curly hair.

Web Summary : Achieve wavy or curly hair at home without heat or chemicals. Braiding damp hair, using fabric strips, or headbands creates natural curls. Aloe vera gel enhances texture. It's a safe, affordable hair styling solution.
टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडीब्यूटी टिप्समहिला