Join us

फक्त १० रुपयांत हेअर स्पा, केस होतील मऊ सुळसुळीत आणि चमकदार! चमचाभर तांदळाच्या पिठाचा उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 09:05 IST

Hair spa at home under 10 rupees: Silky and shiny hair home remedies: आपल्याला कमी वेळेत आणि कमी खर्चात सोप्या पद्धतीने घरच्या घरी हेअर स्पा करायचा असेल तर हा सोपा उपाय करुन पाहा.

बिघडलेल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यासह केसांवर परिणाम होतो.(Silky and shiny hair home remedies) केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जाऊन त्यावर हेअर ट्रिटमेंट घेतो. (How to stop hair fall naturally)केसगळती, केसातील कोंडा आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो.(Home treatment for hair loss) केसगळती आणि केसांच्या इतर समस्या रोखण्यासाठी आपण हेअर स्पा करु शकतो. (Budget hair spa at home for soft hair)ब्यूटी पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात.(Homemade remedies to stop hair fall) तसेच यासाठी आपल्याला तितका वेळ देखील द्यावा लागतो.(How to get shiny hair with kitchen ingredients) आपल्याला कमी वेळेत आणि कमी खर्चात सोप्या पद्धतीने घरच्या घरी हेअर स्पा करायचा असेल तर हा सोपा उपाय करुन पाहा.(Reduce hair fall instantly) ज्यामुळे आपले केस ग्लॉसी आणि शायनी होतील. 

तमन्ना भाटियाच्या फ्लॉलेस स्किनचे सिक्रेट! ग्लोइंग त्वचेसाठी खास 'घरगुती उपाय', वाढत्या वयात दिसाल सुंदर

हेअर स्पा बनवण्यासाठी 

पाणी - १ कप तांदाळाचे पीठ - १ वाटी अंडी -१ दही - १ छोटी वाटी नारळाचे तेल - २ चमचे 

सगळ्यात आधी गॅसवर एका भांड्यात पाणी तापवून घ्या. त्यात तांदळाचे पीठ घालून शिजवून घ्या. त्याची दाटसर पेस्ट तयार होईल. आता त्यात एक अंड, दही आणि नारळाचे तेल घालून चमच्याने चांगले फेटून घ्या. हा हेअर मास्क केसांवर लावा. यामुळे केसांना घरच्या घरी हेअर स्पाची ट्रिटमेंट मिळेल. आठवड्यातून एकदा असे केल्याने केस सिल्की आणि शायनी होतील. 

1. तांदळाच्या पीठामुळे केस मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होते. यात असणारे प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी केस मजबूत बनवतात. 

2. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि इतर पोषक तत्वे असतात. जे आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. केसांना हायड्रेट ठेवण्याचे काम अंडे करते. 

3. केसांसाठी दही हे नैसर्गिक कंडिशनर आहे. यात प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजे आढळतात. जे केसांना चमकदार, मजबूत आणि निरोगी बनवतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी