पावसाळा सुरू झाला की निसर्गाचं सौंदर्य अधिक खुलतं, पण त्याचबरोबर हा पावसाळा अनेक समस्या देखील सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक समस्या सतावतात परंतु त्यातील (okra water hair mask benefits) फार कॉमन आणि सगळ्यांना त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे केसांचा फ्रिझीनेस. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे केस लवकर फ्रिझी होतात, गुंततात आणि त्यांचा नैसर्गिक मऊपणा पूर्णपणे हरवतो. सततच्या दमट हवामानामुळे केस (monsoon hair care with okra water) कोरडे होतात आणि त्यांना ‘फ्रिझी’ म्हणजेच अधिक राठपणा येतो. पावसाळ्यात केसांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अनेकींना सतावतात. पावसाळ्यात केसही अधिक जास्त गळू लागतात(Hair Mask Okra Water For Hair Secret Remedy To Get Silky & Shiny Hair In Monsoon).
केसांना जर फ्रिझीनेस आला असेल तर अशा केसांची हेअर स्टाईल तर सोडा साधं केस विंचरण देखील फार कठीण होत. अशा परिस्थितीत, केसांचा फ्रिझीनेस कमी करण्यासाठी आपण केसांना वेगवेगळ्या प्रकारचे जेल किंवा इतर अनेक उपाय करून पाहतो. परंतु हे उपाय तेवढ्यापुरतेच असतात हे आर्टिफिशियल उपाय करणं बंद केले तर केसांचा फ्रिझीनेस परत वाढू लागतो. यासाठी केसांचा फ्रिझीनेस कमी करण्यासाठी काहीतरी ठोस व कायमचा उपाय करणे फायदेशीर ठरते. केसांच्या फ्रिझीनेस कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये भेंडीचे जेल वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये असलेले नैसर्गिक घटक केसांना पोषण देतात आणि त्यांना मऊ, चमकदार बनवतात. पावसाळ्यात केसांचा फ्रिझीनेस कमी करण्यासाठी भेंडीपासून तयार केलेल्या जेलचा नेमका वापर कसा करावा ते पाहूयात.
केसांचा फ्रिझीनेस कमी करण्यासाठी भेंडी आहे फायदेशीर...
भेंडी फक्त खाण्यासाठीच नाही, तर केसांसाठीही एक वरदानच आहे. यातील चिकट पदार्थ हेअर सीरमसारखे काम करते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात, जे केसांना आतून पोषण देतात. यामुळे केस चमकदार, मुलायम आणि निरोगी दिसतात.
फ्रिझीनेस कमी करण्यासाठी भेंडीचे पाणी कसे तयार करावे ?
एका कढईत ३ ग्लास पाणी गरम करा. त्यात ७ ते ८ कापलेल्या भेंड्या, १ चमचा मेथी दाणे आणि कोरफडीचा गर घालावा. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या, जेणेकरून सर्व पोषक तत्व त्यात मिसळतील. जेव्हा मिश्रण घट्ट होईल, तेव्हा ते गाळून एका भांड्यात काढून ठेवा. हेच मिश्रण म्हणजे केसांचा फ्रिझीनेस कमी करणार भेंडीचं हेअर जेल.
दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...
या भेंडीच्या हेअर जेलचा वापर कसा करावा ?
सर्वात आधी हे जेल केसांना आणि स्काल्पला चांगल्या प्रकारे लावा. त्यानंतर, हलक्या हातांनी कंगवा फिरवा, जेणेकरून जेल संपूर्ण केसांना लागेल. केस कापडाने झाकून ३० ते ४० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा नियमितपणे याचा वापर केल्यास केसांचा कोरडेपणा कमी होईल आणि केस मऊ व चमकदार दिसू लागतील. भेंडीच्या हेअर जेलमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल मिसळून लावल्यास दुहेरी फायदा होतो. या उपायाचा नियमित वापर केल्याने केस फक्त सुंदरच दिसत नाहीत, तर दीर्घकाळ पोषण मिळते व केस आतून मजबूत होतात.
भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ...
केसांवर भेंडीचे हेअर जेल लावण्याचे फायदे...
१. भेंडीतील चिकट पदार्थ केसांना नैसर्गिक मॉइश्चरायझर देतो, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
२. पावसाळ्यात दमट हवामानामुळे केस कोरडे आणि राठ होतात. भेंडीचं जेल केसांना पोषण देऊन त्यांचा राठपणा कमी करतं.
३. हे जेल नैसर्गिक असल्याने केसांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि केसांना नैसर्गिक पोषण मिळते.
४. नियमित वापराने केस मजबूत होतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.