Lokmat Sakhi >Beauty > प्रमाणापेक्षा जास्त केसगळती-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज प्या आयुर्वेदिक ड्रिंक, केसांच्या वाढीसाठी असरदार उपाय

प्रमाणापेक्षा जास्त केसगळती-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज प्या आयुर्वेदिक ड्रिंक, केसांच्या वाढीसाठी असरदार उपाय

Ayurvedic drink for hair loss: Natural hair care tips: Hair fall control juice: केस पातळ होणे, टक्कल दिसणे, केसात कंगवा घातला की केस हातात येणे यांसारख्या गोष्टी अधिक होतात. महागतले शाम्पू, तेल केसांना लावून देखील केसगळतीची समस्या कायम राहते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 11:36 IST2025-05-21T11:34:42+5:302025-05-21T11:36:27+5:30

Ayurvedic drink for hair loss: Natural hair care tips: Hair fall control juice: केस पातळ होणे, टक्कल दिसणे, केसात कंगवा घातला की केस हातात येणे यांसारख्या गोष्टी अधिक होतात. महागतले शाम्पू, तेल केसांना लावून देखील केसगळतीची समस्या कायम राहते.

hair loss issue beetroot and amla ayurvedic drink boost for hair growth hair care tips | प्रमाणापेक्षा जास्त केसगळती-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज प्या आयुर्वेदिक ड्रिंक, केसांच्या वाढीसाठी असरदार उपाय

प्रमाणापेक्षा जास्त केसगळती-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज प्या आयुर्वेदिक ड्रिंक, केसांच्या वाढीसाठी असरदार उपाय

हल्ली केसगळती अतिशय सामान्य समस्या झाली आहे.(Ayurvedic drink for hair loss) अगदी लहान वयापासून ते वयोवृद्धापर्यंत अनेकांना केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे.(Natural hair care tips) केस गळण्यामागे असंख्य कारणे असू शकतात. यावर वेळीच उपाय केला नाही तर केसगळतीची समस्या वाढू शकते. (Hair fall control juice)
बाहेरचे प्रदूषण, केमिकल्स उत्पादने, केसांना पुरेसे पोषण न मिळणे आणि पुरेशी झोप न घेणे , मानसिक ताण याचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या केसांवर होतो.(Best Ayurvedic drinks to stop hair fall) केस एकदा गळायला लागले की ते दिवसेंदिवस जास्तच गळू लागतात.(Natural solutions for hair thinning) केस पातळ होणे, टक्कल दिसणे, केसात कंगवा घातला की केस हातात येणे यांसारख्या गोष्टी अधिक होतात. महागतले शाम्पू, तेल केसांना लावून देखील केसगळतीची समस्या कायम राहते. (Home remedies for strong and shiny hair)

अकाली पिकणाऱ्या केसांवर चमचाभर कॉफी करेल जादू! 'या' पद्धतीने लावा, केस होतील काळेभोर...

अनेकदा केसांशी संबंधित समस्यांमधील सगळ्यात सामान्य कारण म्हणजे केसांना पोषक तत्व न मिळणे. अनेकदा शरीरातील पोषक तत्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी पूरक आहार घेतात. केसगळती रोखण्यासाठी आपण औषधे घेतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. परंतु, केसगळती रोखण्यासाठी आपण आयुर्वेदिक ड्रिंक प्यायला हवे. 

केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळा फायदेशीर ठरेल. केस गळती रोखण्यासाठी, केसांना काळे करण्यासाठी आणि केसातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण आवळा किंवा त्याचा रस प्यायला हवा. तसेच केसांची काळजी घेण्यासाठी बीट देखील तितकेच फायदेशीर आहे. यासाठी २ ते ३ आवळे, १ बीटरुट, १ चमचा आल्याचा रस, चिमूटभर काळी मिरी पावडर. हे आयुर्वेदिक पेय तयार करुन आपण रोज सकाळी प्यायला हवे. 


केसांच्या अनेक समस्या टाळण्यासाठी हे पेय फायदेशीर ठरेल. बीटरुटमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात. ज्याच्यामुळे केसगळती कमी होऊ शकते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे लोह आणि नायट्रेटचे प्रमाणही वाढवून टाळू सुधारण्यास मदत करते. केस निरोगी ठेवण्यासाठी बीटाचा रस प्यावा. 

Web Title: hair loss issue beetroot and amla ayurvedic drink boost for hair growth hair care tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.