Join us

केस गळून विरळ झालेत- टक्कल दिसतंय? नारळाच्या तेलात कालवा २ पदार्थ, महिन्याभरात केसाची होईल भराभर वाढ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 15:58 IST

how to prevent hair loss: best hair oil for hair growth: जर आपलेही केस गळून विरळ झाले असतील किंवा टक्कल दिसत असेल तर नारळाच्या तेलाचा योग्य वापर करा.

सध्या केसगळतीची समस्या अतिशय कॉमन आहे. केस गळू लागले की, आपल्याला फार टेन्शन येते.(how to prevent hair loss) केसगळती रोखण्यासाठी आपण इतर अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो.(best hair oil for hair growth) केसांना महागातले तेल, शॅम्पू लावतो. परंतु, काही केले तरी केसगळती थांबत नाही. (natural remedies for bald spots)ऋतूमानानुसार केसांची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते.(coconut oil for hair regrowth) केस गळणे, विरळ होणे, केसांता कोंडा होणे किंवा केसांना फाटे फुटणे यांसारख्या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते.(home remedies for hair fall) केसांची काळजी घेण्यासाठी आपण नारळाच्या तेलाचा वापर करतो. नारळाच्या तेलात असणारे घटक केसांसाठी अतिशय फायदेशीर असतात.(how to regrow hair naturally) सततच्या केसगळतीमुळे केस विरळ होतात. कपाळावर किंवा टाळूवर टक्कल दिसू लागते.(effective hair oil for thinning hair) अशा भागात केसांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही.(herbal oil for hair loss) जर आपलेही केस गळून विरळ झाले असतील किंवा टक्कल दिसत असेल तर नारळाच्या तेलाचा योग्य वापर करा. (how to use coconut oil to regrow hair)

केसगळती थांबेल! ट्राय करा 'आयुर्वेदिक हेअर मास्क', केस वाढतील भराभर-होतील लांबसडक-घनदाट

केसांच्या वाढीसाठी नारळाचे तेल 

नारळाच्या तेलात निरोगी फॅटी ॲसिड आहे जे केसांची वाढ करते. पण फक्त नारळाचे तेल लावल्याने केसांची वाढ होत नाही. यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थ मिसळून त्यात लावल्याने केसांच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल. यासाठी कांद्याच्या बिया आणि मेथी दाणे फायदेशीर ठरतील. त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात नारळाचे तेल गरम करुन त्यात कांद्याच्या बिया आणि चमचाभर मेथीचे दाणे घालून शिजवून घ्या. तेलाचा रंग बदलला की, गॅस बंद करा. केसांना लावण्यापूर्वी ते कोमट गरम करुन टाळूची व्यवस्थित मालिश करा. केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावा. यामुळे केसगळती रोखण्यास मदत होईल. 

तमन्ना भाटियाच्या फ्लॉलेस स्किनचे सिक्रेट! ग्लोइंग त्वचेसाठी खास 'घरगुती उपाय', वाढत्या वयात दिसाल सुंदर

केसगळती रोखण्यासाठी सोप्या टिप्स 

1. केस वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा अंड्याचा हेअर मास्क तयार करुन केसांना लावा. यामुळे केसांना मुबलक प्रमाणात प्रथिने मिळतील. 

2. आवळ्याचा रस केसांना लावल्याने फायदा होतो. यात असणारे गुणधर्म केसांच्या वाढीसाठी चांगले आहेत. 

3. कांद्यामध्ये असणारे सल्फेट केसांसाठी फायदेशीर आहे. कांद्याचा रस केसांना लावल्याने केसांची वाढ अनेक पटींनी वाढते. 

4. केसांची वाढ होण्यासाठी मेथी दाण्याचा मास्क केसांवर लावा. रात्री अर्धा कप मेथीचे दाणे पाण्यात भिजवा, दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तयार करुन केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून एकदा केल्याने फरक जाणवेल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी