Join us

डोक्यात सारखा कोंडा होतो, महागडी औषधे लावूनही उपयोग नाही? ' हा ' उपाय करुन पाहा, समस्या संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 16:02 IST

hair dandruff solution at home in marathi: dandruff remedies: glycerin for hair: glycerin for hair fall: glycerin for dandruff: is glycerin good for dandruff: कोंडा आणि केसगळतीमुळे वैतागले असेल तर तो काढून टाकण्यासाठी ग्लिसरीनचा उपाय करुन पाहा...

हिवाळ्यामध्ये आपल्याला अनेक सामान्य आजारांना सामोरे जावे लागते. (dandruff remedies) बदलेल्या ऋतूनुसार त्वचा आणि केस यांच्यावर परिणाम होतो. या काळात वातावरण थंड असल्यामुळे टाळूवरील ओलावा कमी होऊ लागतो. ज्यामुळे केसात कोरडेपणा वाढून कोंड्याची समस्या वाढते. टाळू कोरडी पडू लागली की, केसात खाज सुटते. (Hair Dandruff Solution At Home) पांढरे डाग पडतात तसेच केसगळतीचे प्रमाण वाढू लागते. हिवाळ्यामध्ये आपण अनेकदा गरम पाण्याने आंघोळ करतो. ज्यामुळे टाळूचा कोरडेपणा अधिक प्रमाणात वाढतो. परंतु, आम्ही तुम्हा असा एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोंड्यापासून आराम मिळेल. या समस्येपासून सुटण्यासाठी ग्लिसरीन हा चांगला पर्याय आहे. (glycerine for hair) ग्लिसरीनमध्ये असलेले घटक स्कॅल्पला हायड्रेट करण्यासह त्वचेवरील बुरशी आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. जाणून घेऊया ग्लिसरीनचा योग्य वापर कसा करायचा. 

1. ग्लिसरीन आणि गुलाब पाणी 

ग्लिसरीन आणि गुलाब पाणी एकत्र करुन टाळूला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. तसेच केसातील कोंडा कमी होऊन खाज देखील थांबते. टाळू हायड्रेट होते. 2. ग्लिसरीन आणि कोरफड 
कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपली टाळू चांगली होऊन केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते. तसेच टाळूला होणारी जळजळही कमी होते. याचे मिश्रण टाळूला २० ते ३० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. 3. ग्लिसरीन आणि नारळाचे तेल

नारळाचे तेल केसांची मुळं मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत तर ग्लिसरीन टाळूच्या कोरडेपणापासून केसांचे रक्षण करते. या दोघांचे मिश्रण एकत्र करुन लावल्यास डोक्यातील कोंडा कमी होतो. 4. ग्लिसरीन आणि लिंबू 

लिंबूमध्ये बॅक्टेरिया कमी करण्याचे गुणधर्म अधिक असतात. जे कोंडा निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात आणि ग्लिसरीन टाळू स्वच्छ करते. हिवाळ्यात कोंडा दूर करण्यासाठी ग्लिसरीन हा सोपा उपाय आहे. हे टाळूला मॉइश्चरायझ करते. तसेच केसातील खाज कमी करुन केसांची वाढ करते. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा, मनानं करु नका.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी