Lokmat Sakhi >Beauty > केस विंचरताच केसांची मोठी गुंतवळ हातात येते? ५ सोपे बदल, केसांच्या सगळ्या तक्रारीच संपतील

केस विंचरताच केसांची मोठी गुंतवळ हातात येते? ५ सोपे बदल, केसांच्या सगळ्या तक्रारीच संपतील

hair fall home remedies: causes of hair breakage : काही घरगुती उपायांसोबत आपल्याला रोजच्या जीवनात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे केसांची योग्य पद्धतीने काळजी घेता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 16:11 IST2025-06-25T16:08:55+5:302025-06-25T16:11:10+5:30

hair fall home remedies: causes of hair breakage : काही घरगुती उपायांसोबत आपल्याला रोजच्या जीवनात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे केसांची योग्य पद्धतीने काळजी घेता येईल.

hair fall while combing reduce hair breakage tips daily hair care routine for strong hair | केस विंचरताच केसांची मोठी गुंतवळ हातात येते? ५ सोपे बदल, केसांच्या सगळ्या तक्रारीच संपतील

केस विंचरताच केसांची मोठी गुंतवळ हातात येते? ५ सोपे बदल, केसांच्या सगळ्या तक्रारीच संपतील

केसगळतीच्या समस्येपासून आपल्यापैकी अनेक लोक त्रस्त आहेत.(Hair Care Tips) केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांपासून ते काही घरगुती उपाय करतो. (hair fall while combing) परंतु तरीदेखील केस गरजेपेक्षा जास्त गळणं, पातळ होणं अशा समस्या जाणवतात. केसांना दाट आणि मऊ करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. (reduce hair breakage tips)
केस विंचरताना हातात मोठी गुंतवळ येते अशावेळी नेमकं काय करावं समजत नाही. सकाळी केस विंचरले की हातात केस येतात. अनेकदा ही केस कपड्यांना चिकटून राहतात. (how to stop hair fall naturally) आता टक्कल पडते की काय ही चिंता आपल्याला सतावू लागते. (hair care home remedies) केसगळती रोखण्यासाठी काही घरगुती उपायांसोबत आपल्याला रोजच्या जीवनात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे केसांची योग्य पद्धतीने काळजी घेता येईल. 

९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने केसांना लावतात कांद्याचा रस, योग्य पद्धत पाहा- केसांची होईल वाढ

केसगळती रोखण्यासाठी आपण फक्त उत्पादने बदलण्यावर लक्ष केंद्रित करु नये. आपली जीवनशैली, आहार आणि मानसिक-शारीरिक आरोग्य यावरही लक्ष केंद्रित करायला हवे. आहारातज्ज्ञ अनन्या भाटिया यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला त्या म्हणतात केसगळती रोखण्यासाठी केसांची काळजी रोज घ्यायला हवी. 

केस रोज हळुवारपणे विंचरायला हवे ज्यामुळे केसांचा गुंता वाढणार नाही. डोक्याचा रक्तप्रवाह सुधारून केसगळती कमी होईल. नियमितपणे डोक्याची ५ मिनिटे मालिश करावी. यामुळे ताण कमी होऊन केस वाढण्यास मदत होते. केसांवर मेहंदीचे पाणी स्प्रे करु शकतो. यामुळे केसांची मुळे मजबूत होऊ शकतात. तसेच झोपण्यापूर्वी केसांवर सीरम लावू शकतो. कोरड्या केसांची समस्या टाळण्यासाठी केसांच्या मुळांवर सीरम लावा. रात्री झोपताना केस सैल वेणीत बांधून झोपा. मोकळे सोडू नका. 


केस मजबूत करण्यासाठी आपल्याला आहारात अंडी खायला हवी. यामध्ये भरपूर प्रथिने असतात जे केसांना मजबूत करतात. दैनंदिन आहारात दह्याचा समावेश करु शकता. यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे पचन सुधारण्यास आणि पोषक तत्वांचे योग्य शोषण करण्यास मदत करतात. तसेच आहारात फळे खा, ज्यामुळे शरीरात कोलेजन तयार होईल. यात असणारे प्रोटीन केसांना जाड बनवते. इतकेच नाही तर आहारात अक्रोड, चिया सीड्स, अळशी आणि भोपळ्याच्या बिया इत्यादी पदार्थ खा. 

रोझमेरी तेलाचे २ थेंब, पेपरमिंट तेलाचे २ थेंब यामध्ये आपण वापरत असलेले तेल यात घाला. हे सर्व व्यवस्थित मिक्स करुन डोक्याला लावा आणि चांगला मसाज करा. केस धुण्यापूर्वी  १ ते २ तासाआधी हे लावायला हवे. आठवड्यातून दोनदा शाम्पू करा. त्यानंतर केसांना हेअर मास्क आणि कंडिशनर लावायला विसरु नका. टाळूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी क्लींजिंग शाम्पू किंवा एक्सफोलिएट वापरा. 
 

Web Title: hair fall while combing reduce hair breakage tips daily hair care routine for strong hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.