केसगळतीमुळे हल्ली प्रत्येक वयोगटातील तरुण त्रस्त आहे.(Hair care Tips) केसगळती इतक्या प्रमाणात वाढली आहे की, टक्कल पडण्याची भीती वाटू लागते. अनेकांना केसगळतीची समस्या ही सामान्य वाटते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्षही केले जाते.(Hair falls issue) पण अगदी लहान वयात केस गळतीच्या समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.(hair growth solution)
अधिकचा तणाव, झोपेचा अभाव, अयोग्य आहार, गरम पाणी किंवा शाम्पूने केस वारंवार धुणे यांमुळे केसांवर परिणाम होतो.(Natural cure for hair thinning) केसांच्या मुळांसाठी जितका औषधोपचार महत्त्वाचा असतो तितकंच आपलं मन आणि शरीर शांत ठेवणं आणि योग्य आहार घेणं देखील आवश्यक आहे.
डॉक्टर झैदी म्हणतात केस गळणं हे शरीरातील अनेक समस्यांचे कारण आहे. जर आपल्या केसांना पोषणाचा अभाव, टाळूमध्ये रक्त परिसंचरण खराब होणे, हार्मोनल असंतुलन, जळजळ आणि ताण यामुळे केसांचे आरोग्य खराब होते. पण केसांची काळजी घेण्यासाठी ४ आयुर्वेदिक उपाय केले तर महिन्याभरात केसांचं गळणं कमी होईल.
1. आयुर्वेदात आवळा हा अधिक पोषण तत्वांनी भरलेला आहे. आवळ्याला रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी उकळवून थंड होऊ द्या. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. यात असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स टाळूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे केसगळती कमी होते.
2. आयुर्वेदानुसार भृंगराज तेलाला केसांसाठी बहुगुणी मानले जाते. या तेलामुळे टाळूमधील रक्ताभिसरण वाढते, जळजळ कमी होते आणि केसांच्या कूपांना सक्रिय करण्यास मदत करते. यासाठी हे तेल हलके गरम करुन रात्री डोक्याला मालिश करण्यास मदत करते.
3. कढीपत्त्यांमध्ये बीटा कॅरोटीन, प्रथिने आणि खनिजे असतात. जे केसांची मुळे मजबूत करतात. पाण्यात उकळून, थोडे मध घालून प्यायल्याने केसांची वाढ जलद होते आणि केसांच पातळ होणं कमी होते.
4. मेथीमध्ये असलेले प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड केस गळती रोखते आणि टाळूचा कोरडेपणा आणि कोंडा कमी करते. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या. नंतर या भिजवलेले मेथी दाणे चावून खा.
5. डॉ. झैदी म्हणतात सकाळी रिकाम्या पोटी आवळा पाणी प्यायल्या सांगतात. त्यानंतर २० ते ३० मिनिटांनी मेथीचे पाणी प्या. यानंतर दुपारी कढीपत्त्याचे पाणी प्या. आणि रात्री झोपण्यापूर्वी भृंगराज तेलाने केसांना मालिश करा. असं दोन ते तीन महिने नियमितपणे केल्यास केसांची वाढ होईल. तसेच टक्कल देखील पडणार नाही.