Lokmat Sakhi >Beauty > केसांची वाढ खुंटली-सारखे गळतात? रामबाण उपाय- केस वाढतील भरभर, दाटही होतील

केसांची वाढ खुंटली-सारखे गळतात? रामबाण उपाय- केस वाढतील भरभर, दाटही होतील

Hair fall solution at home: Fast hair growth remedy: Thick hair home treatment: शरीरात काही जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची कमतरता झाली की आपली केसगळतीची समस्या सुरु होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 15:48 IST2025-06-15T15:47:31+5:302025-06-15T15:48:37+5:30

Hair fall solution at home: Fast hair growth remedy: Thick hair home treatment: शरीरात काही जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची कमतरता झाली की आपली केसगळतीची समस्या सुरु होते.

Hair fall solution at home Fast hair growth remedy home treatment Hair fall stop and regrowth tips | केसांची वाढ खुंटली-सारखे गळतात? रामबाण उपाय- केस वाढतील भरभर, दाटही होतील

केसांची वाढ खुंटली-सारखे गळतात? रामबाण उपाय- केस वाढतील भरभर, दाटही होतील

केस गळती रोखण्यासाठी आपण केसांना अनेक प्रकारचे तेल लावतो.(Hair falls issue) केस गळ्यामागे अनेक कारणे असू शकतात. यात केस गळणे, विरळ होणे, कोरडे पडून टक्कल पडण्याची भीती वाटते. पण केस गळल्यानंतर त्यांची वाढ होत नसेल तर ही समस्या गंभीर आहे.(Hair fall solution at home) इतकेच नाही तर केस पातळ देखील होतात. केसांसाठी आपण अनेक केमिकल्स असणारे तेल- शॉम्पूचा वापर करतो. (Fast hair growth remedy)
रसायनयुक्त पदार्थ केसांवर लावल्याने ते चांगले होण्याऐवजी अधिक डॅमेज होतात.(Thick hair home treatment) परंतु केसांना जितके बाहेरुन पोषण मिळणे गरजेचे आहे तितकेच आतूनही पोषण हवे असते.(Ramaban upay for hair fall) आपल्याला शरीरात काही जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची कमतरता झाली की आपली केसगळतीची समस्या सुरु होते.(Hair fall stop and regrowth tips) अशावेळी रिकाम्या पोटी एक खास ड्रिंक प्यायाले तर केसगळती थांबू शकते. 

केस विरळ होऊन टक्कल पडण्यापूर्वी रोज खा ‘ही’ चटणी, केस होतील मोठे- दाट -जाडजूड

आयुर्वेदात असे अनेक घटक आहेत जे आपल्या केसांची निगा राखण्यासाठी मदत करतात. कलोंजी, मेथी दाणे, धने, बडीशेप, जिरे आणि अळशी सारखे घटक केसांची वाढ करण्यास मदत करतात. या पदार्थांचे नियमितपणे सेवन केल्यास केसांना फायदा होतो. 

या मसल्यांमध्ये आवश्यक पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड भरपूर असते. जे केसांसाठी महत्त्वाचे आहे. धने हे केसांसाठी नैसर्गिक कंडीशनर म्हणून काम करते. बडीशेप केसांना व्हिटॅमिन आणि खनिजे पुरवते. जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक तेल असतात. तर अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या सगळ्या घटकांचे सेवन केल्यास केसगळती रोखण्यास मदत होते. तसेत स्काल्प सुधारुन केसांची वाढ होते. 


हे पाणी बनवण्यासाठी सर्व मसाले पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असे नियमितपणे केल्यास केस वाढण्यास मदत होईल. तसेच हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरून केसांच्या मुळावर स्प्रे करा. ३० मिनिटांनी केस धुवा. असं आठवड्यातून तीन वेळा केल्याने केसांच्या समस्या कमी होतील. 
 

Web Title: Hair fall solution at home Fast hair growth remedy home treatment Hair fall stop and regrowth tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.