Join us
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल्सनी केसांची वाट- टक्कल पडायची वेळ आली? आठवड्यातून १ वेळा ‘हा’ हेअर मास्क लावा, केस गळणं होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2025 15:59 IST

Hair fall remedy: Hair mask for hair fall: Reduce hair fall naturally: काही घरगुती सोपे उपाय केल्यास केसांची हरवलेली चमक पुन्हा नव्याने मिळण्यास मदत होईल तसेच केसगळती देखील थांबेल.

सध्या केसगळतीची समस्या ही अनेकांना भेडसावत आहे. लहान वयातच टाळूवर केस विरळ दिसू लागतात, कपाळावरची रेषा मागे सरकते आणि आरशात पाहिलं की “टक्कल पडायची वेळ आली की काय?” असा प्रश्न पडतो.(Hair fall remedy) यामागचं मोठं कारण म्हणजे आपण केसांसाठी वापरत असलेले केमिकल्स. आपले केस सॉफ्ट होण्यासाठी आपण शाम्पू, सीरम, स्प्रे, जेल, हेअर कलर, स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंगसारख्या ट्रीटमेंट्स केसांच्या मुळांपर्यंत नुकसान पोहोचवतात.(Hair mask for hair fall) सुरुवातीला आपले केस सॉफ्ट दिसतात पण हळूहळू केस कोरडे, निस्तेज आणि ठिसूळ होऊ लागतात. (Reduce hair fall naturally)केसांच्या मुळांना सतत केमिकल्सची सवय झाली तर आपली टाळू कोरडी पडते, त्यातील ओलसरपणा कमी होऊ लागतो. यामुळे केसांची वाढ थांबते, कोंडा वाढतो आणि केस गळण्याची समस्या आणखी वाढते. अनेकदा आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरुनही निराश होतात. अशावेळी काही घरगुती सोपे उपाय केल्यास केसांची हरवलेली चमक पुन्हा नव्याने मिळण्यास मदत होईल तसेच केसगळती देखील थांबेल. 

थंडीत चपात्या कडक- वातड होतात? ४ सोप्या ट्रिक्स- दोन दिवस चपात्या राहतील मऊ

अतिरिक्त रसायन, केमिकल्समुळे केस खूप कोरडे आणि रुक्ष झाले असतील तर हा घरगुती हेअर मास्क लावून पाहा. आपल्याला कोरफडीचा गर, अळशी, आणि तांदूळाचा हेअर मास्क बनवावा लागेल. आपल्याला पॅनमध्ये दीड कप पाणी घालून त्यात ३ चमचे अळशीच्या बिया घालाव्या लागतील. नंतर हे पाणी उकळून घ्या. त्याचे जेल तयार करा. नंतर पुन्हा पाणी घेऊन त्यात चार चमचे तांदूळ शिजवून घ्या. 

यानंतर कोरफडीचा गर, अळशीचा जेल आणि उकडलेले तांदूळ मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट गुळगुळीत झाल्यानंतर केसांचा मास्क तयार होईल. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल, नारळाचे तेल किंवा मोहरीचे जेल घाला. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क आपण केसांना लावू शकतो. ३० मिनिटानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर आपले केस सॉफ्ट आणि शायनी होतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hair fall solution: Use this mask once a week to reduce hairfall

Web Summary : Chemicals in hair products cause hair fall. Use a homemade aloe vera, flaxseed, and rice hair mask weekly to revitalize hair and reduce hair fall.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी