सध्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्याला स्वतःकडे पाहायला पुरेसा वेळही मिळत नाही. यातही केसांकडे विशेष लक्ष देऊन त्यांची काळजी घेणं अवघड होत. केसांची जर वेळीच (Jawed Habib hair care secret home remedy) योग्य ती काळजी घेतली नाही तर केसांचे आरोग्य आणि सौंदर्य हरवून जाते. आजकाल तर आपल्यापैकी बऱ्याचजणांना केसांच्या अनेक समस्या सतावतात. यात केसगळती, केसांत कोंडा होणे, केस दुभंगणे, केसांची वाढ थांबणे, केस रुक्ष - निस्तेज दिसू लागणे अशा समस्या त्रास देतात(Hair Expert Jawed Habib Hair Growth Secret Onion Juice Is Beneficial For Hair Know The Right Way To Use It).
आपण सगळेच केसांच्या वारंवार वाढत जाणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी काही ना काही उपाय करतोच. कधी तेल बदलून पाहतो तर कधी शाम्पू तर कधी हेअर मास्क देखील वापरतो, केसांवर या सगळ्यांचा थोडाफार परिणाम होतोच. परंतु केसांच्या अनेक समस्यांवर हजारो वेगवेगळे उपाय करण्यापेक्षा हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब सांगतात, "कांद्याचा रस काफी है"... प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांचं म्हणणं आहे की, कांद्याचा रस केसांसाठी असरदार ठरतो. केसांसाठी घरगुती उपायांमध्ये (Onion juice for hair fall and regrowth) कांद्याचा रस हा सगळ्यांत उत्तम आणि स्वस्तात मस्त असा उपाय आहे. कांद्यात असलेले नैसर्गिक सल्फर आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसांची मुळे बळकट करतात, केस वाढवतात आणि स्काल्प हेल्दी ठेवतात. यासाठीच, केसांच्या अनेक (How to use onion juice for hair regrowth) समस्यांवर सतत वेगवेगळे उपाय करण्यापेक्षा कांद्याचा रस वापरणे फायदेशीर ठरते. केसांसाठी कांद्याच्या रसाचा वापर कसा करावा ते पाहूयात...
जावेद हबीब सांगतात केसांसाठी कांद्याचा रस फायदेशीर...
प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सांगितले आहे की, कांद्याचा रस हा केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. याच्या वापराने केसांची वाढ होते आणि केस दाट व मजबूत होतात. कांद्याचा रस हा शाम्पू व तेलांपेक्षा अधिक परिणामकारक काम करतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
चमकदार दात हवेत तर ‘या’ ४ पदार्थांनी घासा, टूथपेस्टपेक्षाही भन्नाट उपाय-दातांची घ्या काळजी...
मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...
जावेद हबीब यांच्या मते, कांद्याच्या रसामुळे केसगळती, टक्कल पडणे, स्काल्पचा कोरडेपणा, अकाली केस पांढरे होणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवता येते. ते पुढे सांगतात की, कांद्याचा रस वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे – आठवड्यातून एकदा, केस धुण्यापूर्वी, डोक्यावर ताजा कांद्याचा रस लावावा. यामुळे केसांची मुळे बळकट होतात आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यास मदत होते.
केसांवर कांद्याचा रस लावण्याचे फायदे...
१. केसगळती कमी होते :- कांद्यात भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि केसगळतीची समस्या कमी करतं. हा सल्फर स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारतो आणि केराटिनच्या निर्मितीला मदत करतो, ज्यामुळे केसांची गळती व तुटणं कमी होतं.
२. केसांची वाढ होते :- कांद्याचा रस कोलेजन उत्पादन वाढवतो, जे नवीन केस उगवण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या कमी होण्यास मदत होते आणि केस अधिक दाट व मजबूत होतात.
आणा बेकिंग सोडा, विसरा केसातला कोंडा! बेकिंग सोड्यासह ३ पदार्थ मिसळून केसांना लावा, कोंडा गायब...
३. कोंड्यापासून सुटका :- कांद्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे स्काल्पवरील संसर्ग दूर करतात. त्यामुळे केसांतील कमी होतो.
४. केस अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते :- कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स केसांमधील मेलानिन टिकवून ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या कमी होते.
५. स्प्लिट एंड्स कमी करतो :- कांद्याचा रस केसांचं पोषण करतो आणि केसांना मजबुती देतो, त्यामुळे स्प्लिट एंड्स कमी होतात.