Join us  

घामामुळे केसांवर येणारा चिकट, तेलकटपणा 'कसा' घालवाल; लगेचच वापरून पाहा ८ ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 5:05 PM

Hair care Tips : चिकट केसांपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

ठळक मुद्देतेलकट केसांवर अशी केसांची उत्पादने वापरली पाहिजेत, ती फक्त तेलकट केसांसाठी बनविली जातात. तुम्हाला याचा सर्वाधिक फायदा मिळू शकेल.

उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांचेच केस तेलकट होतात.  त्यामुळे फक्त केसच नाही तर आपला संपूर्ण लूक खराब होतो. म्हणून उन्हाळ्याच्या वातावरणात त्वचेसह केसांवरही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे.  तुम्ही  घरचं काम, जॉब यामध्ये व्यस्त असल्यानं अनेकदा केसांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. अशा स्थितीत केसांचं तेल काढून टाकण्यासाठी वारंवार शॅम्पूचा वापर केला जातो.

कोरडे केस  कोणलाही आवडत नाहीत. पण उन्हाळ्यात मात्र घामामुळे केस जास्तच चिकट आणि तेलकट होतात. आज आम्ही तुम्हाला चिकट केसांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तेलकट केसांपासून सुटका मिळवता येऊ शकते. केस चमकदार आणि चांगले राहण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते. इतकंच नाही तर चांगल्या केसांसाठी तश्या उत्पादनांचा वापर करायला हवा. 

१) नारळाचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. हे तेल लावल्यानं मजबूत, चमकदार केस मिळतात.  त्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात लिंबू पिळून त्यात थोडंस लेवेंडर तेल एकत्र करा. या मिश्रणानं आपल्या केसांची मालिश करा.  मालिश केल्यानंतर ४, ५ तासांनी  पाणी आणि शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवून टाका. 

२) शॅम्पूचा वापर करण्यापूर्वी आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला तेलकट केसांपासून सुटका मिळवायची असेल असेंशियल ऑईलच्या मिश्रणानं केसांना मसाज करा काहीवेळ केस असेच ठेवून मग धुवून टाका. 

३) तेलकट केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात शॅम्पू वापरणे देखील टाळावे. आपण फक्त वरच्या भागावर शॅम्पू लावावा आणि कंगव्याच्या मदतीने केसांवर पसरवावे. हे केसांना तेलकट होण्यापासून प्रतिबंधित करते. 

४) तेलकट केसांवर कंडिशनर वापरण्याची आवश्यकता नाही. असे मुळीच नाही. तेलकट केसांसाठीही कंडिशनर वापरणे देखील आवश्यक आहे. कंडिशनर कधीही टाळूवर लागू नये. याची काळजी घ्या, सौम्य कंडिशनर वापरावा, या दरम्यान हेअरमास्कचा वापर करू नये.

५) तेलकट केसांपासून मुक्त होण्यासाठी किंवा केसांमधून तेल कमी करण्यासाठी, शॅम्पूनंतर अॅपल साइडर व्हिनेगरने आपले केस धुवा. यासाठी आपण एका मग पाण्यात व्हिनेगर  पाण्यात घालून आपल्या केसांना लावा. हे केस खूप चमकदार बनवते आणि तेल देखील काढून टाकते.

६) इतकेच नाही तर आपण तेलकट केसांवर अशी केसांची उत्पादने वापरली पाहिजेत, ती फक्त तेलकट केसांसाठी बनविली जातात. तुम्हाला याचा सर्वाधिक फायदा मिळू शकेल. तेलकट केसांवर एरंडेल तेल वापरणे टाळावे.

७) तेलकट केस टाळण्यासाठी आपल्याला वारंवार केसांवर हात फिरण्याची सवय देखील सोडून द्यावी लागेल. यासह, आपल्याला हेअरब्रश कमी वेळा वापरावा लागेल. कारण यामुळे केसांमध्ये अधिक सिबम तयार होते. ज्यामुळे केस तेलकट बनतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण केस विंचरायचेच नाहीत. केसांच्या ब्रशच्या सहाय्याने आपल्याला आपले केस योग्य प्रकारे सेट करता येतात. पण जास्तवेळा याचा वापर करणं टाळावे.

८) कोंडा बहुधा तेलकट केसांमधे एक समस्या देखील असतो. अशा वेळी आपण लिंबाचा रस नारळाच्या तेलात मिसळून लावाला. यामुळे डोक्यातील कोंडा दूर होईल आणि केस तेलकट होणार नाहीत. तसंच एक चमचा मध आणि दोन चमचे नारळाचं तेल एकत्र करा. केस धुण्याआधी ३० मिनिटे हे कंडिशनर केसांना लावा.

साधारणत: कंडिशनर केस धुतल्यानंतर लावले जाते. पण हे घरच्याघरी तयार केलेले कंडिशनर केस धुण्याच्या आधीच लावावे लागते हे लक्षात ठेवा. नेहमी कंडिशनर आपण केसांच्या टोकांना लावतो मात्र हे कंडिशनर केसांच्या मुळापासून ते टोकांपर्यंत व्यवस्थित लावावे. लावून झाल्यानंतर शॉवर कॅप लावून  ३० मिनिटे ठेवून द्यावे. नंतर शॅम्पूने केस धुवावेत.

टॅग्स :ब्यूटी टिप्समहिलाकेसांची काळजी