Join us
Daily Top 2Weekly Top 5

२० रुपयांचा देसी उपाय, रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटात केसांना लावलं की कोंडा-केस गळणं बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2026 12:12 IST

Hair fall remedy: Dandruff treatment at Home: Desi hair care remedy: अवघ्या २० रुपयांत तयार होणारा हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी केल्यास केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात केस गळणं, कोंडा होणं, टाळू कोरडी पडणं या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. महागडे तेल, सिरम, ट्रिटमेंट वापरुनही फारसा फरक दिसत नाही.(Hair fall remedy) महागड्या जाहिरातींना भुलून आपण केसांना केमिकल्सचं कोटिंग तर करतो पण आतून केस मात्र डॅमेजच राहतात.(Dandruff treatment at Home) पांढरे केस आणि हेअर लॉसमुळे आपला कॉन्फिडन्स लो होतो. ( Desi hair care remedy)अशावेळी आपल्यापैकी अनेकजण नैसर्गिक उपायांकडे वळतात. केसांची योग्य काळजी नाही घेतल्यास केसांशी संबंधित विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. काहींचे केस सतत गळतात. तर काहींचे केस पांढरे आणि पातळ होतात. घनदाट, काळेभोर केस कोणाला नकोत. पण केसांच्या निगडीत समस्या वाढत असल्यामुळे प्रत्येक जण त्रस्त आहेत. कोंडा, केस गळती यामुळे आपणही त्रस्त असाल तर, घरगुती हेअर टॉनिकचा वापर करून पाहा. घरच्या घरी करता येणाऱ्या उपायाबद्दल सध्या खूप चर्चा आहे. त्यातीलच एक रोझमेरीचे पाणी. अवघ्या २० रुपयांत तयार होणारा हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी केल्यास केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

७ दिवसांत दिसेल फरक! आल्याच्या रसात मिसळा ३ गोष्टी, चेहरा चमकेल- केसही वाढतील भरभर, स्वस्त घरगुती उपाय..

रोझमेरी ही एक सुगंधी आणि आयुर्वेदिक हर्बल उपचार आहे. रोझमेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत होते. टाळूवर साचलेली घाण, जंतुसंसर्ग आणि अतिरिक्त तेल कमी होण्यास याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे कोंड्याची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.

रोझमेरीचं पाणी बनवण्यासाठी आपल्याला एक कप पाण्यात १ ते २ चमचे वाळलेली किंवा फ्रेश रोझमेरी घालून १० ते १५ मिनिटे उकळून घ्यावं लागेल. नंतर पाणी गाळून थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत भरा. हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर हलक्या हाताने स्प्रे करुन बोटांनी मसाज करा. हे पाणी लावल्यानंतर केस सुकू द्या.ओले ठेवू नका. यासाठी आपल्याला केस धुण्याची गरज नाही. 

नियमित या पाण्याचा वापर केल्यास टाळूतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळून केस मजबूत होण्यास हातभार लागतो. तसेच यामुळे केस गळणं कमी होतं, केस मऊ राहणं आणि टाळू स्वच्छ देखील होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rosemary water: A simple remedy for hair fall and dandruff.

Web Summary : Struggling with hair fall and dandruff? Try rosemary water! This easy, inexpensive home remedy can help cleanse the scalp, reduce dandruff, and promote hair growth with regular nightly use.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी