सध्याच्या काळात केस गळणं, अकाली केस पांढरे होणं आणि केसांची वाढ खुंटणं ही समस्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मऊ- मुलायम केसांसाठी आपण महागडे तेल, शाम्पू किंवा हेअर स्पा ट्रिटमेंट घेतो, पण केसांना जितके बाहेरुन पोषण हवे असते तितकेच आतून देखील असायला हवे.(Seeds for hair growth)
केस गळणं, वाढ न होणं, कोरडेपणा, टोकं फुटणं या सगळ्या समस्या आजकाल अगदी लहान वयातच सुरू झाल्या आहेत.(Natural hair growth tips) महागडे तेल, सीरम, शॅम्पू बदलूनही केसांमध्ये हवा तसा फरक दिसत नाही. स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या तीन छोट्या बिया केसांसाठी एखाद्या अमृतासारख्या ठरतात.(Best seeds for healthy hair) योग्य पद्धतीने रोज सेवन केल्यास केसांची मुळं मजबूत होतात आणि वाढही वेगाने होते. या तीन बिया नियमित कशा पद्धतीने खायला हव्या पाहूया.
जवस, चिया बिया आणि भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आपल्या केसांच्या मुळांना पोषण देत नाहीत तर टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करतात आणि जळजळ कमी करतात, ज्यामुळे केस लांब आणि दाट होतात.
भोपळ्याच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी प्रथिनांचा खजिना आहे. यामध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते, जे केसांच्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. झिंकच्या कमतरतेमुळे अनेकदा केस गळती सुरु होते. रोज चमचाभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्या तर ओमेगा- ३ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई असते, जे आपल्या टाळूचे आरोग्य सुधारते.
अळशी ही आपल्या केसांसाठी सगळ्यात चांगली सूपरफूड मानले जाते. यात मुबलक प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असते. हे अॅसिड केसांमधील कोरडेपणा दूर करुन केसांना नैसर्गिक चमक देण्याचे काम करतो. अळशीमुळे केसांची लवचिकता वाढते, ज्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण देखील कमी होते.
चिया सिड्समध्ये भरपूर फायबर आणि फॉस्फरस असते. या बिया आपल्या शरीरातील लोह शोषून घेण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, यामुळे केसांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि केसांची वाढ वेगाने होते. यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांचे प्रदूषण आणि उन्हापासून संरक्षण करतात.
भोपळ्याच्या बिया, अळशी भाजून घ्या. त्याच चिया सीड्स मिसळून याची पावडर तयार करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर पावडर कोमट पाण्यासोबत किंवा दह्यासोबत खा. महिन्याभरात आपल्याला केसांची वाढ पाहायला मिळेल. केस अधिक जाड आणि मजबूत होतात.
