आलिया, प्रियंकाचे केस इतके सुंदर कसे असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. बाहेर फिरायला गेल्यानंतर असो किंवा एखाद्या पार्टीत या हिरोइनचे केस अगदी सेट असतात. (Dry Shampoo Recipe) ना तेलकट ना चिकट. त्यांच्या चेहऱ्यासोबतच ते केसांची देखील चांगल्या प्रकारे काळजी घेतात. (How to Make Dry Shampoo at Home) आपल्याला जितके चेहऱ्याचे सौंदर्य महत्त्वाचे आहे तितकेच केसांचे देखील. हल्ली केसांच्या समस्येमुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती त्रस्त आहे. आपलेही केस लांबबसडक, काळेभोर आणि रेशमी असावे असे प्रत्येकाला वाटते.(Homemade Dry Shampoo for Travel) पण कधीकधी या केसांची काळजी घेणे आपल्याला कठीण होऊ बसते. जर आपली टाळू तेलकट असेल तर आपले केस २ दिवसात चिकट आणि घाण वाटू लागतात. (Alia Bhatt Hairstyling Tips)
आपण घरापासून लांब गेल्यानंतर केस धुणे फारसे शक्य होत नाही. अशावेळी केस अधिक कोरडे किंवा चिकट होतात.(Priyanka Chopra Hair Care Secrets) यावेळी केसांची योग्य प्रमाणात काळजी घ्यायला हवी. अशा परिस्थितीत केसांसाठी ड्राय शाम्पू वापरणे फायदेशीर आहे. केस न धुता ड्राय शाम्पुमुळे टाळूवरील तेल कमी होते.(Travel-Friendly Hair Tips) यामुळे केस सॉफ्ट आणि शाइनी दिसू लागतात.
केसांच्या वाढीसाठी आणि टाळूवरील तेलकटपणा काढण्यासाठी बाजारात अनेक महागडे केमिकलयुक्त शाम्पू वापरतो. तसेच वेगवेगळ्या ब्रँडचे ड्राय शाम्पू देखील मिळतात. या शाम्पूची किंमत देखील तितकीच जास्त असते. परंतु हा ड्राय शाम्पू आपण घरच्या घरीच बनवू शकतो.
ड्राय शाम्पू कसा बनवायचा?
ड्राय शाम्पू बनवण्याची खास पद्धत आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ सारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर यांनी त्यांच्या इंस्टा अकाउंटवरुन शेअर केली आहे. ते म्हणतात की, ड्राय शाम्पू बनवण्यासाठी फक्त ती गोष्टीची आवश्यकता असते. ॲरोरुट पावडर, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या किंवा सुगंधीत लेव्हेंडर आणि स्प्रेची बाटली. ॲरोरुट पावडर, सुकलेल्या गुलाबाच्या किंवा लेव्हेंडरच्या पाकळ्या चहाच्या पिशवीसारखे भरा आणि स्प्रेच्या बाटलीत टाका. या बाटलीत पाणी घालून आपण हवा तेव्हा केसांवर स्प्रे करु शकतो.
ड्राय शाम्पूचा केसांसाठी फायदा
1. हेअर स्टायलिशच्या मते, ॲरोरुट पावडरमध्ये स्टार्च असतो. जो ड्राय शाम्पूमध्ये चांगला घटक म्हणून ओळखला जातो.
2. यामुळे केसांमधील स्टार्च तेल आणि सेबम पूर्णपणे शोषून घेतो. हे केस चिकट होण्यापासून रोखते. ड्राय शाम्पूमुळे आपले केस अधिक चांगले होतात.