Join us

थंडीत केसांचा झाडू होतो, कोरड्या केसांमुळे दिसतो भयानक! ३ सवयी बदला, केस होतील रेशीम मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2025 16:07 IST

Hair becomes frizzy in the winter? dry hair looks terrible! Change 3 habits, hair will become silky soft : थंडीच्या दिवसांत केसांची काळजी कशी घ्यावी. जाणून घ्या घरगुती उपाय.

थंडीचे दिवस आल्यानंतर त्वचेप्रमाणेच केस आणि टाळूवरही परिणाम होतो. थंड, कोरडी हवा केसांतील ओलावा शोषून घेते, ज्यामुळे केस कोरडे, निस्तेज आणि कमकुवत होतात. टाळूतील नैसर्गिक तेलाचे संतुलन बिघडल्याने कोंडा आणि खाज वाढते. (Hair becomes frizzy in the winter? dry hair looks terrible! Change 3 habits, hair will become silky soft)त्यामुळे या काळात केसांची काळजी घेण्यासाठी काही विशेष उपाय करणे आवश्यक ठरते.

थंडीत केस धुताना सर्वात मोठी चूक म्हणजे अति गरम पाण्याचा वापर. थंडीत गरम पाणी छान वाटते म्हणून केसांसाठीही कढत गरम वापरणे फार वाईट सवय आहे. गरम पाणी केसांतील नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकते. त्याऐवजी कोमट पाण्याने केस स्वच्छ करावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हलक्या हाताने तेल मालीश करणे अत्यंत फायदेशीर असते. तीळाचे तेल, खोबरेल तेल किंवा बदाम तेल कोमट करुन टाळूवर १०–१५ मिनिटे मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते, केसांना पोषण मिळते आणि कोरडेपणा कमी होतो.

स्काल्पच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय फार प्रभावी ठरतात. कोंडा आणि खाज दूर करण्यासाठी कोरफडीचे जेल आणि लिंबाचा रस  टाळूवर लावावा. काही मिनिटांनी धुवून टाकल्यास टाळू स्वच्छ राहते. कोरडे केस सुधारण्यासाठी दही, मध आणि थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून हेअर मास्क तयार करता येतो. हा मास्क केसांना ओलावा देतो, केसांचा तजेला वाढवतो आणि मऊपणा टिकतो. केस धुताना सौम्य आणि नैसर्गिक घटक असलेले शॅम्पू वापरावेत. मेथी दाण्यांचा पेस्ट, कडीपत्ता किंवा भृंगराज तेल यांचा वापरही केसांच्या मुळांना बळकटी देतो. आठवड्यातून एकदा या उपायांनी केसांना नैसर्गिक पोषण मिळते.

थंड हवेमुळे बाहेर जाताना केसांवरील ओलावा झपाट्याने कमी होतो, म्हणून डोक्यावर स्कार्फ, टोपी घालणे गरजेचे आहे. तसेच आहारातही बदल महत्त्वाचाच. ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्, जीवनसत्त्व ई, लोह, आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की बदाम, अक्रोड, तीळ, कडधान्ये आणि हिरव्या भाज्या नियमित खाव्यात. हे केसांच्या वाढीस मदत करतात आणि नैसर्गिक चमक टिकवतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Winter Hair Woes? 3 Simple Changes for Silky Soft Hair

Web Summary : Combat winter hair dryness with lukewarm water washes, oil massages, and nourishing hair masks. Protect hair outdoors, and consume omega-3s, vitamins, and protein-rich foods for healthy, shiny hair.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सहोम रेमेडीमहिला