Join us

आयब्रोजचे केस विरळ, शेपही धड नाही? आल्याच्या रसात 'या' तेलाचे २ थेंब मिसळा - भुवया होतील दाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 14:27 IST

how to grow thicker eyebrows naturally at home : ginger remedy for eyebrow growth : home remedies for thick eyebrows : ayurvedic home remedy for eyebrows : ginger for eyebrow hair growth : पातळ - विरळ आयब्रोसाठी हा खास घरगुती उपाय केल्यास आयब्रो दाट, जाडसर दिसू लागतात...

आयब्रो चे केस पातळ - विरळ असतील तर चेहऱ्याचा संपूर्ण लूकच बिघडतो. आपल्यापैकी अनेकींच्या आयब्रो चे केस पातळ - विरळ असल्याने अनेकजणी आयब्रो पेन्सिल किंवा (ginger remedy for eyebrow growth) मेकअपचा वापर करतात. परंतु प्रत्येकवेळी आयब्रो दाट व जाडसर दिसण्यासाठी मेकअप करण्यापेक्षा त्यावर काहीतरी अस्सल ठोस उपाय करणे फायदेशीर (ginger for eyebrow hair growth) ठरते. आयब्रो दाट व जाडसर दिसण्यासाठी आर्टिफिशियल उपायांचा (how to grow thicker eyebrows naturally at home) वापर केल्याने आयब्रो चे केस आणखीनच कमजोर होऊ शकतात. यासाठीच, नैसर्गिकरित्या दाट आणि जाडसर भुवया हव्या असतील तर घरगुती व नैसर्गिक उपाय करणे फायदेशीर ठरेल(ayurvedic home remedy for eyebrows).

आयब्रो चेहऱ्याच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पातळ किंवा विरळ आयब्रोमुळे चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य बिघडते. आयब्रोसाठी महागडे आर्टिफिशियल प्रॉडक्ट्स किंवा ट्रीटमेंट घेण्यापेक्षा, आल्याच्या रसात दोन खास तेल मिसळून आयब्रोवर लावल्याने त्यांचा पोत सुधारतो आणि त्या अधिक दाट व जाडसर होतात. हा उपाय कसा करावा आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात. आयब्रोसाठी हा खास घरगुती उपाय केल्यास आयब्रो दाट, जाडसर दिसू लागतात आणि चेहऱ्याचा लूक अधिक खुलून येतो.

आयब्रो चे केस जाडसर व दाट होण्यासाठी घरगुती उपाय... 

जयपूरचे प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर मनोज दास यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, या उपायाचा वापर केल्यास आयब्रो आणि पापण्यांचे केस दुपटीने वाढतील. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी १ टेबलस्पून आल्याचा रस, एरंडेल तेल, बदामाचे तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

उपाय नेमका आहे तरी काय ? 

हा उपाय तयार करण्यासाठी, सर्वातआधी आपल्याला आले किसून घ्यावे लागेल. नंतर, ते दाबून त्याचा रस काढा. आल्याचा रस केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर मानला जातो. आल्याच्या रसामध्ये थोडे एरंडेल तेल (Castor oil) आणि बदामाचे तेल (Almond oil) मिसळा. हे सर्व घटक चांगले एकत्रित मिक्स करुन घ्या. हे तयार मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या मदतीने आयब्रोवर लावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

स्काल्पची त्वचा वारंवार कोरडी पडतेय? ३ पदार्थांनी करा मिनिटभर स्काल्पचा मसाज - कोरडेपणा होईल दूर... 

केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...

हा उपाय आयब्रोसाठी कसा फायदेशीर ठरतो ? 

१. आलं :- आलं केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते. यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि इतर पोषक घटक असतात. आल्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारते, ज्यामुळे आयब्रोच्या केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते. परिणामी, केस मुळापासून मजबूत, काळे आणि दाट होतात.

२. एरंडेल तेल :- एरंडेल तेल (Castor oil) आयब्रो दाट करण्यास मदत करतात. यामध्ये रिसिनोलिक ॲसिड, फॅटी ॲसिड आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते ज्यामुळे आयब्रोच्या केसांची वाढ सुधारते.

३. बदामाचे तेल :- बदामाचे तेल आयब्रो चे केस मजबूत करतात, ज्यामुळे केसांची निरोगी वाढ होते. यात असलेले व्हिटॅमिन-ई आणि फॅटी ॲसिड भुवयांच्या केसांना चमकदार बनवतात. तसेच, यात केसांसाठी फायदेशीर असलेले अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय