रेशमी, चमकदा आणि मऊ केस कुणला आवडत नाही. सध्याची जीवनशैली, प्रदूषण आणि केमिकल्स उत्पादनांचा अतिवापर यामुळे आपले केस कोरडे, निर्जीव आणि गुंता होतो. केसांचा झाडूसारखा झालेला हा पोत सुधारण्यासाठी आपण अनेकदा पार्लरमध्ये जाऊन महागडे हेअर स्मूथनिंग किंवा स्पा ट्रिटमेंट करतो.(Hair Care tips) या ट्रिटमेंट्समुळे केसांना तात्पुरता ग्लो मिळत असला तरी त्यातील केमिकल्समुळे आपले केस अधिक गळतात आणि कोरडेपणा वाढतो.(Hair Smoothing at Home) पण आपल्या स्वयंपाकघरातील साध्या गोष्टी आणि बागेतील गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वापरुन आपण घरच्या घरी नॅचरल हेअर स्मूथनिंग करु शकतो.(Natural Rose Hair Mask) हा हेअर पॅक केसांना चमकच देत नाही तर मुळांपासून त्यांचे पोषण करतो. केसांची गुंतागुंत सहज सुटते आणि केस गळण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होते.(How to fix dry and frizzy hair) पाहूया, केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय ठरणारा हा मॅजिक गुलाब पॅक कसा तयार करायचा.
उन्हामुळे डोळ्यांची आगआग होते करा ३ उपाय-शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्याचा सोपा उपाय
हेअर पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
शिजवलेला भात - ३ ते ४ मोठे चमचेगुलाबाच्या पाकळ्या - १ मोठा चमचा गुलाब पाणी- गरजेनुसारअळशीचे जेल- १ मोठा चमचामध - १ छोटा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी ३ ते ४ चमचे शिजवलेला भात आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करा.
2. त्यात थोडे गुलाब पाणी घालून मिक्सरमधून त्याची एकदम मऊ पेस्ट तयार करा.
3. ही पेस्ट एका वाटीत काढून त्यात अळशीचे जेल आणि मध मिक्स करा.
4. सर्व साहित्य एकजीव करुन त्याची पेस्ट तयार झाली की हेअर पॅक तयार.
हा पॅक लावण्यापूर्वी केस थोडे विंचरुन घ्या. केसांच्या मुळांपासून ते शेवटच्या टोकापर्यंत हा पॅक व्यवस्थित लावा. साधारण ३० ते ४० मिनिटे हा पॅक केसांना लावून ठेवा. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास कोरड्या केसांपासून सुटका होईल.
Web Summary : Achieve smooth, shiny hair at home using a natural rose hair pack. This DIY treatment nourishes hair from root to tip, detangles easily, reduces hair fall, and combats dryness. The pack uses ingredients like cooked rice, rose petals, flaxseed gel, and honey for healthy, manageable hair.
Web Summary : प्राकृतिक गुलाब हेयर पैक का उपयोग करके घर पर स्मूथ और चमकदार बाल पाएं। यह DIY उपचार बालों को जड़ से टिप तक पोषण देता है, आसानी से उलझन सुलझाता है, बालों का गिरना कम करता है और सूखेपन से लड़ता है। स्वस्थ, प्रबंधनीय बालों के लिए पैक में पके हुए चावल, गुलाब की पंखुड़ियां, अलसी का जेल और शहद जैसी सामग्री का उपयोग किया जाता है।