Join us  

केस गळणं अती झालंय? फक्त अर्धा कांदा या पद्धतीने केसांना लावा; विंचरायचा कंटाळा येईल इतके वाढतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:48 PM

Four Ways To Use Onion Juice : केस गळणं, केस तुटणं कमी करण्यासााठी किंवा केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता.

हेअर केअर उत्पादनांमध्ये कांद्याचा रसाचा वेगवेगळ्या पद्धतीने केसांवर लावला जातो. (Hair Care) कांद्याचा रस केस केसांना फायदेशीर ठरतो. (How To Use Onion Juice For Hairs) केस गळणं, केस तुटणं कमी करण्यासााठी किंवा केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता. केसांना लांब, दाट बनवण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्याच्या रसाच्या वापराने केस दाट, काळेभोर होण्यास मदत होईल. (Four Ways To Use Onion Juice On Hairs For Long And Thick Hairs)

केस लांब करण्यासाठी कांद्याचा रस कसा फायदेशीर ठरतो

कांद्याचा रस तुम्ही केसांना वेगवगेळ्या पद्धतीने लावू शकता. कांद्याचा रस काढण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. एक कांदा घ्या तो कांदा ब्लेंडरमध्ये घालून वाटून घ्या. त्यानंतर कांदा पिळून रस वेगळा काढून ठेवा,  तयार कांद्याचा रस केसांना वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही  लावू शकता. 

कोण म्हणतं गोड खाल्ल्याने डायबिटीस वाढतं? डॉ. विकास दिव्यकिर्ती सांगतात 'हा' भाजलेला पदार्थ खा, शुगर वाढणार नाही

कांद्याचा रस केसांना लावण्याची पहिली पद्धत

केसांना कांदा लावण्याची पहिती  पद्धत अशी की सगळ्यात आधी कांद्याचा रस काढून घ्या त्यानंतर कापसाने किंवा बोटांच्या साहाय्याने  केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावा. कांद्याच्या रसात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.

नारळाच्या तेलात कांद्याच्या रसाचे हेअर ग्रोथ ऑईल तयार करू शकता. यासाठी एका वाटीत नारळाचे तेल घ्या त्यात कांद्याचा रस घालून मिसळा. या तेलाने केसांची मसाज करा.  आठवड्यातून २ ते ३ वेळा  केसांवर या तेलाने मसाज करा. नारळाच्या तेलात कांद्याचा रस मालिश करू शकता. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल तुम्ही केसांना लावू शकता. 

दिवसभरात किती लिटर पाणी प्यावे? पाहा पाणी पिण्याची योग्य पद्धत-वजनही होईल कमी

नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. कांद्याच्या रसाचा हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी हेअर मास्क बनवण्यासाठी कांद्याच्या रसात मिसळा. हा हेअर मास्क १० मिनिटं ते १५ मिनिटं लावून धुवून टाका. केस लांब होण्यास मदत होईल केस मऊ होतील.

पिवळ्या मेथीच्या दाण्यांमध्ये कांद्याचा रस मिसळून हेअर मास्क लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक चमचा मेथीचा दाण्यांची पावडर घ्या आणि एका कांद्याचा रस प्या. हा हेअर मास्क केसांना १० ते १५ मिनिटं लावून ठेवा. नंतर केस पुन्हा धुवा. महिन्यातून २ वेळा हा हेअर मास्क लावल्याने केसांची चांगली वाढ होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी