केसांची सुंदरता आणि चांगले आरोग्य हे केवळ वरवरच्या देखभालीवर अवलंबून नसते, तर केसांच्या मुळांमध्ये दडलेले असते. खरंतरं, केसांची मुळे मजबूत तर केसांचे सौंदर्य आणि आरोग्य देखील उत्तमच राहते. आपण अनेकदा केसांच्या लांबीवर आणि सौंदर्यावर लक्ष देतो, पण जर केसांची मुळेच कमकुवत असतील, तर केस गळणे, तुटणे आणि निस्तेज होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. प्रदूषण, स्ट्रेस, चुकीचे हेअरकेअर प्रॉडक्ट्स आणि पोषणाची कमतरता यामुळे केसांची मुळे कमजोर होतात, योग्य काळजी, पोषक आहार आणि काही सोपे घरगुती उपाय केले तर केसांची मुळे पुन्हा मजबूत करता येतात आणि केस सुंदर व निरोगी दिसतात(how to use flaxseed powder for hair).
केसांची मुळे मजबूत असणे म्हणजे केसांना आवश्यक पोषण मिळणे आणि स्काल्पचे आरोग्य चांगले राहाणे. जेव्हा केसांची मुळे मजबूत असतात, तेव्हा केसांचे आयुष्यमान वाढते, त्यांची घनता वाढते आणि ते नैसर्गिकरित्या जाड, चमकदार व सुंदर दिसू लागतात. अशावेळी नैसर्गिक उपायांमध्ये अळशीची बियांची पावडर म्हणजे केसांसाठी एकदम गुणकारी उपाय ठरते. ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, व्हिटॅमिन 'ई' आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त असलेली ही पावडर केसांच्या मुळांना आतून पोषण देते, स्काल्पला हायड्रेट करते आणि केसांची वाढ दुप्पट वेगाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केसांची मुळे मजबूत असणे गरजेचे असते, यासाठीच (benefits of flaxseed powder for hair roots) अळशीच्या बियांच्या पावडरचा वापर केसांसाठी नेमका कसा करावा ते पाहूयात...
केसांची मुळे मजबूत करण्यासाठी अळशीच्या बियांची पावडर कशी करावी ?
केसांची मुळे मजबूत करण्यासाठी अळशीच्या बियांची पावडर करण्यासाठी सर्वातआधी, अळशीच्या बिया स्वच्छ करा आणि चाळणीने चाळून घ्या, जेणेकरून त्यातील माती आणि घाण निघून जाईल. मग पॅन मंद आचेवर गरम करून त्यात या बिया घालूंन ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्याव्यात. मग या भाजलेला बिया एका डिशमध्ये काढून थोड्या थंड होऊ द्याव्यात, थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात या बिया घालून नीट त्याची पावडर होईपर्यंत वाटून घ्याव्यात. अळशीच्या बियांची पावडर केसांसाठी वापरायला तयार आहे. अळीशीच्या बियांची पावडर एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावी.
केसांसाठी अळीशीच्या बियांच्या पावडरचा वापर नेमका कसा करावा ?
अळशीच्या बियांच्या पावडरचा उपयोग हेअर मास्क, हेअर जेलच्या रूपात किंवा तेलात मिसळूनही करू शकता. हेअर मास्क बनवण्यासाठी अळशीच्या पावडरमध्ये दोन चमचे नारळाचे तेल, दही आणि ॲलोवेरा जेल मिसळा आणि घट्ट पेस्ट बनवा. ही तयार पेस्ट ५ ते ७ मिनिटे केसांवर लावा आणि ८ ते १० मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवा.
अळशीच्या पावडरचा वापर आपण केसांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनेही करू शकता. यासाठी नारळाचे किंवा तिळाचे तेल कोमट गरम करून घ्या. यात अळशीची पावडर मिसळून तेल गाळून घ्या आणि हे तेल स्काल्पला आणि केसांवर मालिश करुन लावा, रात्रभर तेल केसांवर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने धुवून स्वच्छ करा.
केसांसाठी अळशीच्या पावडरचे हेअर जेल तयार करण्यासाठी सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात दोन कप पाणी उकळवावे. यात आता ४ ते ५ चमचे अळशीची पावडर मिसळा आणि घट्ट जेलसारखे टेक्सचर येईपर्यंत मिश्रण उकळवून घ्या. आता हे तयार जेल केसांवर लावा. केसांच्या लांबीनुसार मुळांपासून ते टोकापर्यंत लावू शकता. उत्तम परिणामांसाठी हे जेल स्काल्पवर देखील लावा. हे जेल ३० मिनिटांसाठी केसांवर तसेच लावून ठेवावे, केसांना थंड पाण्याने धुवून घ्या. केस मऊ आणि चमकदार होतील.
केसांसाठी अळशीच्या बियांची पावडर वापरण्याचे फायदे...
१. अळशीत असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड केसांच्या मुळांना खोलवर पोषण देऊन त्यांना मजबूत करतात.
२. यात असलेले प्रथिने केसांना तुटण्यापासून वाचवतात आणि त्यांची घनता वाढवतात.
३. अळशीच्या वापरामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि ते मुलायम होतात.
४. यात असलेले व्हिटॅमिन 'ई'आणि मॅग्नेशियम केसांची वाढ जलद गतीने करण्यास मदत करतात.
५. हे केस गळणे कमी करते, ज्यामुळे केस दाट आणि निरोगी बनतात.
