Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > बेबी हेअर्स भरपूर येतात, पण वाढतच नाहीत ? मेथी दाण्यांसोबत लावा ३ नैसर्गिक पदार्थ - लहान बेबी हेअर्सही वाढतील वेगाने...

बेबी हेअर्स भरपूर येतात, पण वाढतच नाहीत ? मेथी दाण्यांसोबत लावा ३ नैसर्गिक पदार्थ - लहान बेबी हेअर्सही वाढतील वेगाने...

Short hair problem solution : Rapid hair growth natural remedy : Fenugreek seeds for hair growth : मेथी दाण्यांसोबतच इतर घरगुती पदार्थांचा वापर केल्यास केसांच्या वाढीस अधिक चालना मिळते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 13:44 IST2025-11-26T13:30:27+5:302025-11-26T13:44:35+5:30

Short hair problem solution : Rapid hair growth natural remedy : Fenugreek seeds for hair growth : मेथी दाण्यांसोबतच इतर घरगुती पदार्थांचा वापर केल्यास केसांच्या वाढीस अधिक चालना मिळते....

Fenugreek seeds for hair growth Rapid hair growth natural remedy Short hair problem solution | बेबी हेअर्स भरपूर येतात, पण वाढतच नाहीत ? मेथी दाण्यांसोबत लावा ३ नैसर्गिक पदार्थ - लहान बेबी हेअर्सही वाढतील वेगाने...

बेबी हेअर्स भरपूर येतात, पण वाढतच नाहीत ? मेथी दाण्यांसोबत लावा ३ नैसर्गिक पदार्थ - लहान बेबी हेअर्सही वाढतील वेगाने...

केस काही केल्या वाढतच नाहीत, तुटतात, पातळ होतात किंवा मध्येच वाढ थांबते ही समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. आजकाल केसांच्या वेगवेगळ्या  समस्या फार सतावतात. चुकीचा आहार, प्रदूषण, रासायनिक प्रॉडक्ट्स आणि ताणतणाव यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस वाढीचा वेग मंदावतो. केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतो. केसांच्या समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये मेथी दाण्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते. परंतु केसांसाठी फक्त मेथी दाणेच वापरणे पुरेसे नसते, तर मेथी दाण्यांसोबतच इतर अनेक घरगुती पदार्थांचा वापर केल्यास केसांच्या वाढीस अधिक चालना मिळते(Fenugreek seeds for hair growth).

मेथी दाणे केसांसाठी सुपरहेल्दी मानले जातात, पण त्यात आणखी ३ खास पदार्थ  मिसळल्यास त्याचा परिणाम दुपटीने वाढतो. केसांसाठी मेथी दाण्यांचा वापर केल्यास केसांची मुळे मजबूत करते, केसगळती कमी करते आणि थांबलेली वाढ पुन्हा सुरू करते. मेथीचे दाणे प्रथिने आणि निकोटिनिक अ‍ॅसिडचा उत्तम खजिना आहेत, जे केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि नवीन केसांच्या वाढीला चालना देतात. मेथीच्या दाण्यांमध्ये आणखी ३ नैसर्गिक आणि शक्तिशाली असे नेमके कोणते पदार्थ मिसळायचे ते पाहूयात...

केसांसाठी मेथी दाण्यांचा असा करा वापर... 

१. मेथी दाणे आणि खोबरेल तेल :- खोबरेल तेल स्काल्पला खोलवर पोषण देते आणि केस तुटण्यापासून थांबवते. यामध्ये मेथीचे दाणे मिसळल्याने हे हेअर फॉलिकल्सना अ‍ॅक्टिव्ह करतात. २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा.सकाळी ते वाटून पेस्ट बनवा. यामध्ये ३ ते ४ चमचे खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण हलके गरम करून स्काल्पला लावा. ४५ मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवून घ्या. 

२. मेथी दाणे आणि एलोवेरा जेल :- एलोवेरा स्काल्पला थंडवा देते, केसांतील कोंडा काढून टाकते आणि केसांची मुळे मजबूत करते. हे दोन्ही घटक केस जलद गतीने वाढवण्यास मदत करतात. मेथी दाण्यांच्या पेस्टमध्ये २ चमचे एलोवेरा जेल मिसळा आणि ते संपूर्ण केसांच्या मुळांमध्ये लावून मसाज करा. नंतर केस स्वच्छ धुवून घ्या. 

हातावर तेल घेऊन ‌थेट केसांना लावण्याची जुनी पद्धतच चुकीची, ‘असं’ तेल लावा-केसगळती होते बंद... 

३. मेथी दाणे आणि दही :- कोरड्या, निर्जीव केसांवर दही आणि मेथीचा मास्क खूप फायदेशीर ठरतो. मेथीच्या पेस्टमध्ये ३ चमचे दही मिसळून लावा. हे केसांमध्ये ओलावा आणते आणि केसांची वाढ जलद गतीने होण्यास मदत करते. 

कांद्याची सालं फेकू नका, आहेत फायदेशीर! करा नॅचरल हेअर कलर - पांढरे केसही होतील काळेभोर... 

मेथी हेअर मास्क किती वेळा लावावा?

जर तुम्हाला केसांची जलद गतीने वाढ व्हावी असे वाटत असेल, तर हा मास्क आठवड्यातून ३ दिवस लावा. ३ ते ४ आठवड्यांतच 'बेबी हेअर्स' दिसू लागतात आणि केस मजबूत होऊ लागतात. छोटे किंवा हळू वाढणारे केस यावरचा उपाय नेहमी महागड्या ट्रिटमेंटमध्येच नसतो. जर तुम्ही मेथीच्या बियांना खोबरेल तेल, कोरफड (Aloe Vera) किंवा दही यांच्यासोबत मिसळून नियमितपणे लावले, तर ते केसांची वाढ अनेक पटींनी वाढवू शकते. हा नैसर्गिक उपाय केवळ सुरक्षितच नाही, तर केसांना चमक, मजबूती आणि दाटपणा देखील देतो.

Web Title : बेबी हेयर जल्दी बढ़ाएं: मेथी के साथ 3 प्राकृतिक सामग्री का उपयोग करें।

Web Summary : बालों के धीरे बढ़ने से परेशान हैं? नारियल तेल, एलोवेरा या दही के साथ मेथी के बीज बालों के विकास को बढ़ावा दे सकते हैं। ये प्राकृतिक उपचार जड़ों को मजबूत करते हैं, बालों का गिरना कम करते हैं और घने, तेजी से बढ़ने वाले बालों को बढ़ावा देते हैं।

Web Title : Grow baby hairs fast: Use fenugreek with 3 natural ingredients.

Web Summary : Struggling with slow hair growth? Fenugreek seeds mixed with coconut oil, aloe vera, or yogurt can boost hair growth. These natural remedies strengthen roots, reduce hair fall, and promote thicker, faster-growing hair.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.