Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसात भरपूर कोंडा- खराट्यासारख्या झाले? आठवड्यातून १ वेळा 'हा' हेअर मास्क लावा- टाळू होईल स्वच्छ- वाढतील जोमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2026 17:04 IST

Dandruff treatment: Anti dandruff hair mask: Home remedy for dandruff: काही घरगुती सोपे उपाय केल्यास केसांची हरवलेली चमक पुन्हा नव्याने मिळण्यास मदत होईल तसेच कोंडाही कमी होईल.

आपलेही केस लांबसडक-सुंदर असावे असं प्रत्येकाला वाटतं. धूळ, प्रदूषण आणि केमिकल्सच्या अतिवापरामुळे आजकाल अनेकांचे केस खराट्यासारखे राठ आणि निर्जीव झाले आहेत.(Dandruff treatment) त्यात केसांत भरपूर कोंडा झाला की, सतत खाज सुटते. निस्तेज आणि कोंड्यामुळे जीव हैराण होतो. कोंड्यामुळे केसगळती देखील प्रचंड होते. टाळूवर केस विरळ दिसू लागतात.(Anti dandruff hair mask) कपाळावरची रेष मागे सरकते. आरशात पाहिलं की टक्कल पडायची वेळ येते की काय? असा प्रश्न पडतो. (Home remedy for dandruff)केसांच्या मुळांना महागड्या केमिकल्सची सवय झाली तर आपली टाळू कोरडी पडते, त्यातील ओलसरपणा कमी होऊ लागतो. यामुळे केसांची वाढ थांबते, कोंडा वाढतो आणि केस गळण्याची समस्या आणखी वाढते. अनेकदा आपल्याला महागडे प्रॉडक्ट्स वापरुनही निराश येते. अशावेळी काही घरगुती सोपे उपाय केल्यास केसांची हरवलेली चमक पुन्हा नव्याने मिळण्यास मदत होईल तसेच कोंडाही कमी होईल. 

टिपिकल ब्लाऊज घालता आणि काकूबाई दिसता, पाहा हॉल्टरनेक कॉटन ब्लाऊजचे १० डिझाइन्स- उन्हाळ्यातली कुल स्टाइल

1. आपल्या टाळूवर सतत खाज सुटत असेल आणि कोंडा कमी होत नसेल तर त्यांच्यासाठी मेथी दाणे चांगले आहे. दह्यामध्ये मेथी घालून हेअर मास्क तयार करा. यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची लोण्यासारखी मऊ पेस्ट करा. त्यात दही मिसळा. हे मिश्रण टाळूच्या त्वचेला थंडावा देऊन पीएच लेव्हल संतुलित करते. दह्यातील लॅक्टिक अॅसिड टाळूवरील मृत पेशी काढून टाकते. 

2. केस खराट्यासारखे राठ झाले असतील आणि त्यांना मऊ करायचे असेल तर हॉट ऑईल मास्क केसांना लावा. खोबऱ्याचे तेल केसांना पोषण देते. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी कोमट खोबऱ्याच्या तेलात मेथीची पावडर घाला.हे तेल केसांना लावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि केस तुटण्याचे, गळण्याचे प्रमाण कमी होईल. 

3. केमिकल ट्रिटमेंटमुळे केस खराब झाले असतील तर कोरफड आणि मेथी दाण्याचे मिश्रण केसांना रिपेअरिंगचे काम करते. कोरफडमधील एन्झाइम्स खराब झालेली टाळूची त्वचा दुरुस्त करतात. तर मेथी केसांना पुन्हा चमकण्यास मदत करते. 

4. अनेकदा केस गळल्यामुळे डोक्यावर टक्कल दिसू लागते. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनांचा खजिना आहे. मेथी आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क केसांना लावल्यास मुळे घट्ट होतात. तसेच अकाली पांढरे होणारे केसही नियंत्रणात येतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dandruff be gone: Use this hair mask for strong, shiny hair.

Web Summary : Combat dandruff and dry, damaged hair with simple home remedies. Methi and curd mask cleanses scalp. Hot oil with methi strengthens hair. Aloe vera repairs, curry leaves promote growth, reversing hair fall.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी