Join us
Daily Top 2Weekly Top 5

चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 20:26 IST

fennel seeds for hair color naturally : fennel seeds hair dye for white hair : मुखवास म्हणून खाल्ली जाणारी 'बडीशेप' पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी ठरते रामबाण उपाय...

आजकाल केस पांढरे होणे ही समस्या फक्त वाढत्या वयाशी मर्यादित राहिलेली नाही. ताणतणाव, चुकीचा आहार आणि प्रदूषणामुळे अनेकांना कमी वयातच केस पांढरे होण्याचा त्रास जाणवतो. बाजारात मिळणारे महागडे हेअर डाय क्षणिक रंग तर देतात, पण त्यातील 'अमोनिया'सारखी घातक केमिकल्स केसांचे कायमस्वरूपी नुकसान करतात. अशावेळी आपण पुन्हा एकदा घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देतो... आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली बडीशेप केवळ पचनासाठीच नव्हे, तर केसांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरते(fennel seeds for hair color naturally).

बडीशेपपासून तयार केलेला इन्स्टंट हेअर डाय केसांना सौम्य, इन्स्टंट आणि नैसर्गिक रंग देण्यास मदत करतो आणि त्याचबरोबर केसांना पोषणही पुरवतो. आपण रोज मुखवास म्हणून खात असलेली 'बडीशेप' केवळ पचनासाठीच नाही, तर पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकते. बडीशेपमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक खनिजं केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना नैसर्गिक काळा रंग मिळवून देण्यास मदत करतात. कोणतेही साईड (fennel seeds hair dye for white hair) इफेक्ट नसलेला हा 'इन्स्टंट नॅचरल हेअर डाय' घरच्याघरी कसा तयार करायचा (how to make saunf hair dye at home) आणि त्याचे केसांसाठी फायदे काय आहेत, ते पाहूयात. 

बडीशेपपासून घरच्याघरीच इन्स्टंट हेअर डाय कसा तयार करावा? 

 घरच्याघरीच इन्स्टंट बडीशेप हेअर डाय (natural hair dye with fennel seeds) बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते. बडीशेपचा इन्स्टंट हेअर डाय तयार करण्यासाठी आपल्याला ४ ते ५ मोठे चमचे बडीशेप, १ मोठा ग्लास पाणी, डायला गडद काळा रंग येण्यासाठी लोखंडी कढई, १ टेबलस्पून कोरफड जेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

केस धुताना खूप गुंता होतो?  शाम्पू करण्याआधी करा १ बदल - तासंतास गुंता काढायची कटकट विसरा... 

हेअर डाय तयार करण्याची पद्धत... 

एका मोठ्या पातेल्यात बडीशेप घेऊन त्यात पाणी घालावं. बडीशेप पूर्णपणे भिजेल इतकं पाणी घालावं. रात्रभर बडीशेप पाण्यांत भिजवून घ्यावी. दुसऱ्या दिवशी गाळणीच्या मदतीने पाणी गाळून बडीशेपमधील जास्तीचे पाणी काढून घ्यावे. बडीशेप सुती कापडावर व्यवस्थित पसरवून संपूर्णपणे वाळवून घ्यावी. बडीशेप वाळल्यानंतर तव्यावर घालून मंद आचेवर बडीशेपचा हिरवा रंग बदलून पूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत भाजून घ्यावी. मग ही काळ्या रंगाची भाजून घेतलेली बडीशेप मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावी. तयार हेअर डाय पावडर एका काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवावी. पुढील ३ महिन्यांसाठी ही हेअर डाय पावडर चांगली टिकून राहते.

चेहऱ्याची लटकणारी त्वचा पुन्हा होईल टाईट! रुपयाचाही खर्च नाही 'असा' उपाय - चाळिशीत दिसाल विशीतल्या तरुणीसारख्या... 

आपण आपल्या गरजेनुसार ही हेअर डाय पावडर हवी तेव्हा सोयीनुसार वापरु शकता. आपल्या गरजेनुसार एका बाऊलमध्ये ही बडीशेपची बारीक पूड घेऊन त्यात चमचाभर एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी. हा नॅचरल डाय ब्रशच्या साहाय्याने पांढऱ्या केसांवर आणि मुळांशी लावा. किमान १ ते २ तास केसांवर राहू द्या. त्यानंतर साध्या कोमट पाण्याने केस धुवा. (केस धुताना लगेच शाम्पू वापरू नका). 

बडीशेप हेअर डायचे फायदे... 

१. हा डाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याने यात अमोनिया किंवा पॅराबेन्ससारखे घातक घटक नसतात. यामुळे डोळ्यांना किंवा त्वचेला जळजळ होत नाही.

२. बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस गळणे कमी करतात.

३. बडीशेपमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, जे स्काल्पवरील इन्फेक्शन आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात.

४. या डायमुळे केसांना केवळ काळा रंगच मिळत नाही, तर केसांना एक नैसर्गिक चमक आणि मऊपणा येतो.

५. बडीशेपमधील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकट करतात. भाजलेल्या बडीशेपमुळे केसांना हलका तपकिरी नैसर्गिक रंग मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Fennel seeds for black hair: A cheap, chemical-free hair dye.

Web Summary : Fennel seeds offer a natural, inexpensive way to darken hair. Rich in antioxidants and minerals, they nourish hair roots, reduce hair fall, and combat scalp infections. This DIY dye provides a gentle, chemical-free alternative for healthy, shiny hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय