Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > मेथीदाणा पाणी केसाला लावलेच नाही कधी ? केसांसाठी अमृत-आजीबाईंच्या बटव्यातला घ्या खास उपाय...

मेथीदाणा पाणी केसाला लावलेच नाही कधी ? केसांसाठी अमृत-आजीबाईंच्या बटव्यातला घ्या खास उपाय...

Fast Hair Growth Tonner : how to make hair regrowth toner at home : hair regrowth toner for hair fall control : केसांच्या सर्व समस्यांवर 'वन स्टॉप सोल्यूशन' ठरणारे मेथी दाण्याचे घरगुती टोनर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 13:43 IST2026-01-30T13:34:08+5:302026-01-30T13:43:38+5:30

Fast Hair Growth Tonner : how to make hair regrowth toner at home : hair regrowth toner for hair fall control : केसांच्या सर्व समस्यांवर 'वन स्टॉप सोल्यूशन' ठरणारे मेथी दाण्याचे घरगुती टोनर...

Fast Hair Growth Tonner how to make hair regrowth toner at home hair regrowth toner for hair fall control | मेथीदाणा पाणी केसाला लावलेच नाही कधी ? केसांसाठी अमृत-आजीबाईंच्या बटव्यातला घ्या खास उपाय...

मेथीदाणा पाणी केसाला लावलेच नाही कधी ? केसांसाठी अमृत-आजीबाईंच्या बटव्यातला घ्या खास उपाय...

केसांच्या समस्या आजकाल आपल्यापैकी प्रत्येकीला सतावतात. केसगळतीपासून केसांत कोंडा होणे, केसांची वाढ खुंटणे, केस अकाली पांढरे होणे अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केसांच्या या अनेक समस्यांवर एकच काहीतरी ठोस उपाय असावा असं आपल्याला नेहमी वाटत. केसांचे हरवलेलं सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी, नैसर्गिक उपायांची मदत घेण्याकडे आजकाल अनेकींचा कल वाढलेला दिसतो. केसांसाठी केमिकलयुक्त महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा स्वयंपाकघरातील सहज मिळणारे मेथी दाणे केसांसाठी एक गुणकारी औषध ठरते(hair regrowth toner for hair fall control).

मेथी दाण्यापासून तयार केलेला हेअर टोनर केसांच्या मुळांना पोषण देतो, कोंडा कमी करतो आणि केसांना नैसर्गिक चमक आणतो. मेथी दाण्याचे टोनर नियमित वापराने केस मजबूत, मऊ आणि दाट होण्यास मदत होते. कमी खर्चात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारा मेथी दाण्याचा टोनर केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो. केसांसाठी मेथी दाणे हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. मेथी दाण्यांचे टोनर हा एक असा घरगुती आणि स्वस्त उपाय आहे, जो केसांच्या गळतीवर रामबाण (how to make hair regrowth toner at home) उपाय ठरतो. केसांच्या सर्व (Fast Hair Growth Tonner) समस्यांवर 'वन स्टॉप सोल्यूशन' ठरणारे मेथी दाण्याचे टोनर नेमके घरच्याघरीच कसे तयार करायचे ते पाहूयात... 

मेथी दाण्याचे टोनर नेमके घरच्याघरीच कसे तयार करायचे... 

मेथी दाण्याचे टोनर तयार करण्यासाठी आपल्याला, तांदूळ ४ टेबलस्पून, मेथी दाणे १ टेबलस्पून, लवंग १ टेबलस्पून, कलोंजी १ टेबलस्पून, कडीपत्त्याची पाने १० ते १५, रोझमेरीची पाने ४ ते ५ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

टोनर नेमके कसे तयार करायचे ? 

केसांसाठी टोनर तयार करण्यासाठी सर्वातआधी, एका मोठ्या बाऊलमध्ये तांदूळ, मेथी दाणे, लवंग, कलोंजी, कडीपत्त्याची व रोझमेरीची पाने इतके साहित्य एकत्रित घेऊन ते पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावे. मग एका मोठ्या बाऊलमध्ये हे सर्व घटक पदार्थ घेऊन त्यात ग्लासभर पाणी घालून वरून झाकण ठेवून पुढील २४ तासांसाठी मिश्रण पाण्यात भिजत ठेवावे. २४ तासानंतर हे मिश्रण गाळणीने गाळून त्याचे पाणी एका वेगळ्या काचेच्या स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावं. केसांसाठी घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बहुगुणी असे टोनर वापरण्यासाठी तयार आहे. 

कंगवा-उशी-फरशी म्हणजेच घरभर केस पडलेले दिसतात? अश्वगंधा लेप ‘असा’ लावा, केस गळती बंद...

फक्त २० रुपयांत घरच्याघरीच होईल बॉडी स्क्रबिंग! डेड स्किन, टॅनिंग निघेल मिनिटांत - स्वस्तात मस्त पार्लरसारखे बॉडी स्क्रब... 

केसांसाठी हे औषधी टोनर वापरण्याचे फायदे... 

१. तांदूळ :- तांदळातील औषधी गुणधर्मांमुळे केसांची लवचिकता वाढते आणि केस मऊ व रेशमी होतात.

२. मेथी दाणे :- मेथीमधील प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिडमुळे केस गळणे थांबते आणि केसांची मुळे मजबूत होतात.

३. लवंग :- लवंग स्काल्पमधील रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या वाढीला वेग मिळतो.

४. कलोंजी :- कलोंजीमधील फॅटी ॲसिड्स अकाली पांढरे होणाऱ्या केसांची समस्या रोखण्यास मदत करतात.

५. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्यातील बीटा-कॅरोटीन केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करते.

६. रोझमेरीची पाने :- रोझमेरी नवीन केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते आणि केसांना दाटपणा आणण्यासाठी फायदेशीर ठरते.


Web Title : बालों के लिए मेथी दाना पानी: दादी माँ का खास नुस्खा।

Web Summary : घर पर मेथी दाने का टोनर बनाकर बालों की समस्याएँ हल करें। यह आसान उपाय बालों को मजबूत करता है, रूसी कम करता है और चमक लाता है। चावल, मेथी, लौंग, कलौंजी, करी पत्ता और रोजमेरी का प्रयोग करें। भिगोएँ, छानें और स्वस्थ, मजबूत बालों के लिए स्प्रे करें।

Web Title : Fenugreek water for hair: Grandma's secret for hair health.

Web Summary : Solve hair problems with a homemade fenugreek toner. This easy remedy strengthens hair, reduces dandruff, and adds shine. Use rice, fenugreek, cloves, kalonji, curry leaves, and rosemary. Soak, strain, and spray for healthy, strong hair.