असं म्हणतात की चेहरा जे सांगत नाही, ते आपले डोळे सांगून जातात. यातही एका स्त्रीचे डोळे तर अधिकच बोलके, अधिकच सजग असतात. म्हणूनच चेहऱ्यावर कितीही मेकअप चढविला, कितीही आकर्षक हेअरस्टाईल केली, तरी जोपर्यंत डोळ्यांचा मेकअप होत नाही, तोपर्यंत तो मेकअप परिपूर्ण असणार नाही. तसेच बोल्ड लूक मिळविण्यासाठी केवळ कपडे आणि हेअरस्टाईल यांच्यावरच फोकस करून चालणार नाही. त्यासाठी डोळ्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.डोळ्यांना बोल्ड लूक देण्यासाठी वेगळी सौंदर्य प्रसाधने वापरावी लागतील, असे मुळीच नाही. तुम्ही नॉर्मल ऑफीसला जाण्यासाठी किंवा छोटेखानी पार्टीसाठी तयार होताना डोळ्यांच्या मेकअपसाठी जी सौंदर्य प्रसाधने वापरता, त्याचाच वापर थोडा वेगळ्या पद्धतीने करून तुम्ही तुमच्या डोळ्यांना अतिशय वेगळा लूक देऊ शकता.
बोल्ड लूकसाठी डोळ्यांचा मेकअपही महत्त्वाचा ! डोळ्यांना द्या बोल्ड ॲण्ड हॉट लूक ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:36 IST
बऱ्याचवेळा पार्टीसाठी तयार होताना सगळा मेकअप तर व्यवस्थित केला जातो. स्टाईलिश कपडेही घातले जातात. ज्वेलरीही एकदम हटके निवडली जाते. 'स्टनिंग' लूक येण्यासाठी सगळी तयारी झाली आहे, असे आपल्याला वाटू लागते. पण तरीही काय हुकते ते कळतच नाही. आपल्याला जसे अपेक्षित असते, तसे आपण हॉट ॲण्ड बोल्ड दिसतच नाही. असा अनुभव जर तुम्हीही घेत असाल, तर याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे डोळ्यांच्या मेकअपकडे तुमचे होणारे दुर्लक्ष.
बोल्ड लूकसाठी डोळ्यांचा मेकअपही महत्त्वाचा ! डोळ्यांना द्या बोल्ड ॲण्ड हॉट लूक ..
ठळक मुद्देडोळ्यांना बोल्ड लूक देण्यासाठी वेगळी सौंदर्य प्रसाधने वापरावी लागतील, असे मुळीच नाही. डोळ्यांचा मेकअप करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअपसाठी वापरण्यात येणारी सौंदर्य प्रसाधने ही उत्तम प्रतीची असायला हवी.