आंबट गोड रसाळ द्राक्षं खायला सगळ्यांनाच आवडतात. पण सूर्याच्या घातक अतीनील किरणांपासून वाचण्यासाठी द्राक्षं खाणं उपयुक्त असतं असं एका अभ्यासातून नुकतंच सिध्द झालं आहे. हा अभ्यास द्राक्षं आपल्या त्वचेचं अतीनील किरणांपासून संरक्षण करतात असं सांगतो. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मटॉलॉजी या जर्नलमधे याविषयावरचा नूकताच एक अभ्यास प्रसिध्द झाला. अभ्यासकांनी द्राक्षं खाल्ल्यानंतर शरीरांतर्गत काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळून आलं की द्राक्षं खाल्ल्यानं मेड (MED) मधे वाढ होते. MED म्हणजे एक मोजमाप करणारं रसायन आहे जे किती अतीनील किरणांमूळे आपली त्वचा लाल होते, डीएनएचं नुकसान होतं हे मोजते. म्हणून अभ्यासक द्राक्षांना एक प्रकारे तोंडावाटे घेतलं जाणारं सनस्क्रीन म्हणतात.
द्राक्षं खा, ते त्वचेचं संरक्षण करतात असं सांगितलं तर विश्वास ठेवाल?- अलीकडचे अभ्यास तरी तेच सांगतात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:20 IST
सूर्याच्या घातक अतीनील किरणांपासून वाचण्यासाठी द्राक्षं खाणं उपयुक्त असतं असं एका अभ्यासातून नुकतंच सिध्द झालं आहे. हा अभ्यास द्राक्षं आपल्या त्वचेचं अतीनील किरणांपासून संरक्षण करातात असं सांगतो.
द्राक्षं खा, ते त्वचेचं संरक्षण करतात असं सांगितलं तर विश्वास ठेवाल?- अलीकडचे अभ्यास तरी तेच सांगतात..
ठळक मुद्देअभ्यासकांनी द्राक्षं खाल्ल्यानंतर शरीरांतर्गत काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.हा अभ्यास करताना अडीच कप द्राक्षांइतकी द्राक्षं पावडर या अभ्यासात सहभागी झालेल्यांना सलग १५ दिवस खायला दिली गेली. द्राक्षं पावडर खाल्यानंतर अतीनील किरणांचा प्रतिकार करण्याची त्वचेखालील रंगद्रव्याची क्षमता वाढलेली दिसून आली.