Join us

केळी खा पण साल फेकू नका, करा ३ भन्नाट उपयोग, केसांसह चेहऱ्यासाठी खास ब्यूटी ट्रिटमेण्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 18:23 IST

Banana Peels आपण केळ खाऊन त्याची साल फेकून देतो. मात्र, ती साल फेकून न देता विविध गोष्टींसाठी त्याचा वापर करा..

पोटॅशियम आणि फायबरयुक्त केळीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांना केळी खायला आवडतात. केळी हा फळ विविध गुणांनी समृद्ध आहे. केळीमध्ये अनेक गुण आहेतच यासह केळीच्या सालीमध्ये देखील तितकेच पौष्टिक घटक आहेत. केळीच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी असते. विशेषत: केळीच्या सालीचा वापर करून व्हिटॅमिन बी-6 ची कमतरता भरून काढता येते. आपण केळ खाऊन त्याची साल फेकून देतो. मात्र, ती साल फेकून न देता विविध गोष्टींसाठी त्याचा वापर करता येईल. जाणून घ्या केळीच्या सालींचे भन्नाट फायदे.

केळीच्या सालीपासून हेअर मास्क

हेअर मास्क केसांची वाढ आणि सिल्की होण्यासाठी वापरले जाते. हेअर मास्कसाठी आपण महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र, तसं न करता आपण घरगुती पद्धतीने देखील हेअर मास्क तयार करू शकता. केळीच्या सालीला चांगले सुकवून बारीक करून त्याचा वापर, आपण हेअर मास्कसाठी करू शकता. केळीच्या सालींमध्ये असलेले पोषक तत्वे केसांना नवी चमक आणि वाढ देतील.

दातांची चमक वाढवेल

दररोज ब्रश करून देखील काही जणांचे दात पिवळे पडतात. दातांना नवी चमक देण्यासाठी केळीचे साल उपयुक्त ठरेल. केळीच्या सालीने दात चांगले घासा, असे केल्याने दातांमधील पिवळेपणा निघून जाईल. उत्तम रिझल्टसाठी याचा नियमित वापर करा.

फेसमास्कसाठी उपयुक्त

चेहरा चमकवण्यासाठी केळीचे साल उपयुक्त आहे. केळीच्या सालीमधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे चेहरा तजेलदार होईल. फेसपॅक बनवताना त्यात केळीच्या सालीचा वापर करा. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम आणि पिंपल्सपासून सुटका मिळेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी