Join us

दाट, लांबसडक केसांसाठी डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, केसांमुळे वाढेल सौंदर्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2024 11:38 IST

Easy natural home remedy to get thick hairs : हा उपाय नैसर्गिक असल्याने पार्लरप्रमाणे कोणत्याही रासायनिक घटकांचा केसांशी संपर्क येत नाही.

आपले केस जाड आणि दाट असावेत अशी आपली इच्छा असते. मात्र काही ना काही कारणाने केस खूप गळतात आणि पातळ होतात. केस पातळ असेल की एकतर टक्कल दिसते आणि त्याची काही हेअरस्टाईलही करता येत नाही.पण हेच केस जाड असतील तर ते मोकळे सोडल्यावर किंवा त्याची वेणी, बो घातल्यावरही ते छान दिसतात. केस पातळ असतील तर मात्र आपण ते जाड व्हावेत यासाठीही काही ना काही प्रयत्न करत असतो (Easy natural home remedy to get thick hairs) . 

केस जाड होण्यासाठी अनुवंशिकता,आहारातून केसांना मिळणारे पोषण, आपण केसांची घेत असलेली काळजी, वापरत असलेली उत्पादने या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. पण यातील काही गोष्टी नीट नसतील तर केस रुक्ष होणे, गळणे, पातळ होणे, पांढरे होणे, कोंडा होणे अशा तक्रारी निर्माण होतात.डॉ. मनोज दास यांनी यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय नैसर्गिक असल्याने पार्लरप्रमाणे कोणत्याही रासायनिक घटकांचा केसांशी संपर्क येत नाही. पाहूयात केस दाट आणि लांबसडक होण्यासाठीचा  हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा . 

(Image : Google)

१. महाभृंगराज पावडर १०० ग्रॅम, पांढरे तीळ आणि १०० ग्रॅम आवळा पावडर एकत्र करायचे. 

२. सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण दूध किंवा पाण्यासोबत घ्यायचे. 

३. हा उपाय सलग ३ महिने करावा. त्यानंतर तुम्हाला केसांमध्ये नक्की फरक दिसून येण्यास मदत होईल.

 

४. हा उपाय करायला सोपा असल्याने आणि त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त खर्चही होत नसल्याने केस जाड आणि दाट होण्यासाठी हा उपाय नक्की करून पाहा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी