आपल्या बागेतील हिरव्यागार दुर्वा आपण देवाला वाहतो. पूजापाठ, खास प्रसंग, सण - विधी अशावेळी दुर्वांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या भारतीय परंपरेत तसेच आयुर्वेदात दुर्वांना (Natural Remedies For Hair) विशेष असे स्थान आहे. आपल्याकडे दुर्वा धार्मिक विधींसाठी तसेच त्यातील औषधी गुणधर्मांमुळे अनेक समस्यांवर (Apply Durva Grass Paste On Hair To Regrowth Of Hair) इलाज म्हणून देखील वापरला जातो, पण याशिवाय केसांचे आरोग्य (Durva Grass Is Most Powerful For Hair) व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी देखील दुर्वा (Durva grass for hair growth) अतिशय उपयुक्त ठरतो. केस गळणे, केसांना फाटे फुटणे, स्काल्पचा कोरडेपणा किंवा कोंडा यांसारख्या केसांच्या समस्या आजकाल कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनाचं सतावतात(Durva grass for hair care).
केसांच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या कमी करण्यासाठी आपण हिरव्यागार दुर्वांचा घरगुती व नैसर्गिक हेअर मास्क वापरु शकतो. दुर्वांचा हा आयुर्वेदिक हेअर मास्क केसवाढीपासून स्काल्पच्या आरोग्यापर्यंत अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. दूर्वांपासून तयार केलेला हेअर मास्क केसांच्या विविध समस्यांवर घरगुती, नैसर्गिक आणि कमी खर्चिक पण असरदार उपाय ठरतो. केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी दुर्वांचा हेअर मास्क कसा करायचा तो केसांसाठी कसा वापरायचा ते पाहूयात.
दुर्वा पोषक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' सोबत अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे केसांना निरोगी ठेवतात. केस गळण्याच्या आणि तुटण्याच्या समस्येसाठी फायदेशीर ठरतात. केसांसाठी दुर्वांचा हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वातआधी दुर्वा स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दुर्वा आणि थोडे पाणी घालून त्यांची पेस्ट तयार करून घावी. ही तयार पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून एका बाऊलमध्ये काढून घ्यावी, हिरव्यागार दुर्वांचा हेअर मास्क केसांना लावण्यासाठी तयार आहे.
क्रिती सनॉन न चुकता करते ५ गोष्टी, म्हणून दिसते तिची त्वचा कायम फ्रेश आणि तजेलदार...
केसांसाठी असा करा वापर...
दुर्वांचा हा तयार हेअर मास्क स्काल्प आणि केसांच्या मुळांवर व्यवस्थित बोटांच्या मदतीने लावून घ्यावा. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा जेणेकरून हेअर मास्क स्काल्पमध्ये चांगल्या पद्धतीने शोषला जाईल. हा हेअर मास्क केसांवर २० ते ३० मिनिटे तसाच लावून ठेवावा. त्यानंतर, कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. केसांवर याचा चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा. आपण आपल्या आवडीनुसार, या पेस्टमध्ये थोडे खोबरेल तेल किंवा एलोवेरा जेल देखील घालून मग केसांवर लावू शकता. या हेअर मास्कच्या नियमित वापराने केस जाड, मजबूत आणि निरोगी बनू शकतात. दुर्वा केसांना पोषण तर देतात, शिवाय केस गळणे आणि तुटण्याच्या समस्येसोबतच इतरही समस्या कमी करण्यास मदत होते.
त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या दुर्वांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटॅमिन 'ए' आणि सी सोबत अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात, जे केसांना मुळांपासून मजबूत करतात आणि त्यांना गळण्यापासून रोखतात. हिरव्यागार दुर्वांचा केसांसाठी नियमित वापर केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतो, यासोबतच स्काल्पचे आरोग्य सुधारून केसांना जाड आणि चमकदार करण्यास मदत करते.