Join us

डोळे कोरडे पडलेत? चुरचुरतात, खाज येते, ४ घरगुती उपाय, डोळ्यांचे आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 16:50 IST

Eye Care Tips हिवाळ्यात डोळे - पापण्या कोरडे पडतात. खाज आणि लालसरपणामुळे त्रस्त आहात, ४ उपाय करतील मदत

हिवाळ्यातील गुलाबी थंडी प्रत्येकाला आवडते. मात्र, कोरडेपणा कोणाला आवडत नाही. या दिवसात त्वचा कोरडी, निस्तेज पडते. यासह ओठ देखील फुटू लागतात. कधी कधी डोळ्यांसह पापण्या देखील कोरडे पडू लागतात. शरीराच्या इतर भागातील त्वचेच्या तुलनेत पापण्याची त्वचा मुलायम आणि कोमल असते. त्यामुळे हिवाळ्यात डोळ्यांमधील आद्रता कमी झाल्यानंतर कोरडेपणाची समस्या उद्भवते. आपल्याला जर घरच्या घरी पापण्यावरील कोरडेपणा कमी करायचा असेल तर घरगुती उपाय करून पाहा.

पेट्रोलियम जेली

जर आपल्या डोळ्यांच्या भोवतीने कोरडेपणा जाणवत असेल तर, पेट्रोलियम जेलीचा वापर करून पाहा. डोळ्यांच्या भोवतीने यासह पापण्यावर पेट्रोलियम जेली लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळेल. या जेलीचा योग्य वापर केल्याने डोळे हायड्रेटेड राहतील.

खाज सुटल्यावर डोळ्यांना चोळू नये

डोळ्यांवर कोरडेपणा आल्यानंतर खाज सुटते, याने डोळे लाल आणि लहान होतात. या समस्येपासून सुटका हवी असल्यास डोळ्यांना बर्फाने शेक द्या. याने सूज आणि खाजेपासून आराम मिळेल.

कोमट पाण्याने चेहरा - डोळे धुवा

दिवसभर लॅपटॉपवर काम करून डोळ्यांवर ताण पडू लागतो. याने चेहरा देखील थकल्यासारखा वाटतो. अशा परिस्थितीत दररोज चेहरा कोमट पाण्याने धुवा. याने डोळे स्वच्छ होतील यासह आराम मिळेल.

डोळ्यांना एलर्जी वस्तूंपासून लांब ठेवा

प्रत्येकाच्या डोळ्यांना कोणत्या न कोणत्या वस्तूंची एलर्जी असते. आपले डोळे जर आधीच थकलेली असतील तर, एलर्जी असलेल्या वस्तूंपासून लांब राहणे उत्तम ठरेल. डोळ्यांना आराम देणं तितकेच महत्वाचे आहे. 

टॅग्स :डोळ्यांची निगाहोम रेमेडी