Join us

केस वाढत नाहीत म्हणून कापतच नाही? तुम्ही चुकताय- बघा नियमितपणे हेअरकट करण्याचे ४ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2025 14:42 IST

4 Amazing Benefits of Getting a Haircut Regularly: केस वाढतच नाहीत म्हणूनच मग कशाला कापायचे असं तुम्हालाही वाटत असेल तर पुढे सांगितलेली माहिती एकदा वाचाच... (hair care tips)

ठळक मुद्देचांगल्या हेअर एक्सपर्टकडून काही महिने नियमितपणे हेअरकट करून पाहा. केसांची वाढही चांगली होईल. 

केसांच्या वेगवेगळ्या समस्या हल्ली खूप वाढल्या आहेत. बहुतांश जणांची एक समस्या मात्र जवळपास सारखीच आहे आणि ती म्हणजे आमचे केस अजिबातच वाढत नाहीत. केस खूप जास्त गळतात. आता ज्यांचे केस वाढतच नाहीत ते केस कापतच नाहीत. कारण ज्यांना मोठ्या केसांची आवड असते त्यांना असं वाटतं की केस कापल्याने ते आणखी लहान होतील. शिवाय ते लवकर वाढतही नाहीत. मग ते कशाला कापायचे.. तुम्हालाही असंच वाटत असेल आणि त्यामुळे तुम्हीही वर्षांनुवर्षे केस कापतच नसाल तर तुम्ही चुकत आहात. केस नियमितपणे कापणे का गरजेचं आहे ते एकदा वाचाच..

 

केस नियमितपणे कापण्याचे फायदे

हेअर एक्सपर्टच्या मते केस नियमितपणे कापणं खूप गरजेचं आहे. नियमितपणे म्हणजेच दर ३ महिन्यांनी केस कापायला हवे. 

संशोधनाचा निष्कर्ष- मुलांना लहानपणापासूनच 'हे' काम शिकवा- करिअरमध्ये यशस्वी होऊन आनंदी आयुष्य जगतील 

हल्ली आपण पाहातो की केसांची टोकं दुतोंडी होण्याची किंवा केसांना फाटे फुटण्याची समस्याही खूप वाढली आहे. जर तुम्ही नियमितपणे एखाद्या चांगल्या सलूनमध्ये जाऊन हेअरकट करून घेतला तर केसांच्या टोकांना फाटे फुटणार नाहीत आणि ते रुक्ष, कोरडे दिसणार नाहीत.

 

केस जर नियमितपणे कापले तर आपण त्यांची योग्य पद्धतीने निगा राखू शकतो. काळजी घेऊ शकतो. त्यामुळे मग डोक्यातला कोंडा तसेच केस गळण्याची समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. 

चहाप्रेमी आहात ना? मग चहाचे ४ नियम तुम्हाला माहिती हवेतच! आरोग्य जपत चहा प्यायचा तर....

दर ३ महिन्यांनी केस कापले तर आमचे केस कधी वाढणारच नाहीत. त्यांची लांबी नेहमी कमी- कमीच होत राहील अशी शंकाही अनेकजणींच्या मनात येते. कारण त्यांच्या केसांना चांगली वाढ नसते. मनातली ही शंका दूर करताना हेअर एक्सपर्ट सांगतात की तुम्ही केस कापत नाहीत, म्हणून त्यांची वाढ खुंटल्यासारखी वाटते. एखाद्या चांगल्या हेअर एक्सपर्टकडून काही महिने नियमितपणे हेअरकट करून पाहा. केसांची वाढही चांगली होईल.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't cut hair for growth? Four benefits of regular haircuts.

Web Summary : Many avoid haircuts, fearing slower growth. However, experts recommend trimming every three months to prevent split ends and dryness. Regular haircuts promote healthy hair, reduce dandruff, and minimize hair fall. Consistent trims, contrary to popular belief, encourage better hair growth.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी