Join us

साडी नेसल्यावर पोट जरा जास्तच मोठं दिसतं? १ सोपी ट्रिक- पोट झाकलं जाऊन दिसाल स्लिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2025 17:20 IST

Saree Draping Tips: अनेक जणींना साडी नेसल्यावर सुटलेलं पोट झाकायचं कसं हा प्रश्न पडतोच.. घ्या त्याचंच हे एकदम ट्रिकी उत्तर...(what to do if tummy look bulgy or big in saree?)

ठळक मुद्देज्या साडीचे काठ खूप मोठे आणि जाड आहेत, अशी साडी नेसू नका.

कित्येकजणी एरवी अजिबात साड्या नेसत नाहीत. पण राखीपौर्णिमा ते दिवाळी हे जे काही सणावाराचे दिवस असतात, त्या काळात मात्र हमखास कधी ना कधी साडी नेसणं होतंच.. या दिवसांमध्ये अगदी हौशीने साडी खरेदी केली जाते. पण नेसायची वेळ आली तर मग मात्र सुटलेलं पोट कसं लपवावं हा प्रश्न पडतो. कारण एरवी ड्रेसमध्ये सुटलेलं पोट खूप दिसत नाही (Saree Draping Tips). पण साडीमध्ये मात्र ते लगेच दिसून येतं (Does your tummy look bulgy in a saree?). म्हणूनच साडी नेसताना एक छोटासा बदल करा जेणेकरून तुमचं पोट आपोआप झाकलं जाईल आणि तुम्ही स्लिम दिसू शकाल.(what to do if tummy look bulgy or big in saree?)

पोट जास्त दिसू नये म्हणून साडी कशा पद्धतीने नेसावी?

 

पोटावरचे टायर्स झाकले जावे म्हणून ही एक खास पद्धत लक्षात ठेवा. यासाठी नेहमीप्रमाणे साडीचा नेसता पदर कंबरेजवळ खोचून घ्या आणि दुसरा पदर प्लेट्स घालून खांद्यावर पिनअप करून घ्या. आता साडीचा जो निऱ्या घालताना डाव्या हाताला येणारा भाग असतो तो भाग खूप ओढून उजव्या बाजुला खेचू नका. त्याऐवजी तो बेंबीच्या बराेबर खाली पिनअप करा.

राखीपौर्णिमा : पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नाही? १० मिनिटांत घरीच करा टोमॅटो फेशियल, चेहरा चमकेल 

आता नेहमीप्रमाणे निऱ्या घाला. निऱ्या घालताना डाव्या बाजुचा भाग थोडा मोकळा राहू द्या आणि निऱ्या खोचून घ्या. आता जो डाव्या बाजुचा साडीचा भाग थोडा मोकळा सोडला आहे तो निऱ्यांच्या खालून आत सरकवा आणि उजव्या बाजुने वर ओढून खोचून घ्या किंवा पिनअप करा. अशा पद्धतीने जर निऱ्या घातल्या तर पोट सुटलेलं दिसणार नाही.

 

साडी नेसताना या गोष्टीही लक्षात ठेवा

१. जर पोटाचा भाग खूप मोठा असेल तर खूप वर किंवा खूप खाली साडी नेसू नका. पोटाच्या बरोबर अर्ध्या भागावर येईल या पद्धतीने साडी नेसा.

श्रावणी सोमवारी करा साबुदाण्याचे कुरकुरीत खमंग पॉपकॉर्न! तोंडाला येईल चव- उपवास होईल चटकदार

२. खूप फुगणारी कॉटनची साडी नेसणं टाळा. त्याऐवजी शिफॉन, जॉर्जेट अशा अंगाला चिटकून बसणाऱ्या साड्या नेसा.

३. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या साडीचे काठ खूप मोठे आणि जाड आहेत, अशी साडी नेसू नका. कारण हे काठ जेव्हा तुम्ही निऱ्या घालून खोचता तेव्हा पोटाचा घेर जरा जास्तच मोठा दिसू लागतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स