Join us

Hair Growth Tips : झपाट्याने वाढतील केस! पण बांधून ठेवले तर की मोकळे सोडले तर? सोपा फॉर्म्युला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2025 12:33 IST

Hair growth tips: Tie hair vs leave open hair growth: Rapid hair growth hacks: Hair care tips for healthy growth: आपण केस बांधून ठेवावेत की मोकळे सोडावेत, यामुळे खरंच केसांच्या वाढीवर काही फरक पडतो का? हा प्रश्न अनेकदा डोक्यात येतो.

आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, केस लांब आणि सुंदर असायला हवे.(Hair growth tips) त्यासाठी केसांची आपण विशेष काळजी घेतो.(Tie hair vs leave open hair growth) केसांची काळजी घेण्यासाठी आपण महागडे तेल किंवा अनेक रासायनिक उत्पादनांचा वापर करतो.(Rapid hair growth hacks) केसांची काळजी घेणं ही प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. केस लांब, घनदाट आणि चमकदार दिसावेत असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.(Hair care tips for healthy growth) पण आपण केस बांधून ठेवावेत की मोकळे सोडावेत, यामुळे खरंच केसांच्या वाढीवर काही फरक पडतो का? हा प्रश्न अनेकदा डोक्यात येतो.(Natural hair growth remedies)केसांची वाढ हा आपला  आहार, पाणी पिण्याच्या सवयी आणि शरीरातील पोषणतत्वांवर अवलंबून असते. पण तरीही केस बांधून ठेवण्याची किंवा मोकळे ठेवण्याची पद्धत आपल्या आरोग्यावर परिणाम घडवते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर 

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

आपले केस नेहमी उघडे ठेवले तर त्याचा आपल्या केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. केस उघडे ठेवल्याने धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येतात. त्यामुळे केसांचा ओलावा कमी होतो आणि कोरडेपणा, कोंडा व तुटण्याच्या समस्या वाढतात. सतत केस उघडे ठेवल्याने ते गळू लागतात आणि लांबी वाढत नाही. जर उघडे केस जास्त काळ हवेत आणि धुळीत अडकले तर गुंता होतो. त्यामुळे सतत केस उघडे ठेवू नका. 

केस बांधल्याने त्यांचे संरक्षण होते. केसांचा बन, वेणी किंवा हलक्या पोनीटेलमध्ये बांधल्याने केसांचे धूळ व प्रदूषणापासून वाचतात. तसेच केसांचा गुंता देखील कमी होतो. केस खूप घट्ट बांधू नका, यामुळे आपल्या टाळूवर दाब येतो. आणि छिद्र कमकुवत होतात. यामुळे केस तुटू शकतात आणि पातळ होतात.  

केस वाढवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे ते उघडे न ठेवणे आणि जास्त घट्ट न बांधणे. यासाठी आपण हलकी वेणी किंवा अंबाडा बांधायला हवा. ज्यामुळे केस सुरक्षित राहतील. ज्याचा आपल्या केसांवर ताण येणार नाही. रात्री केस उघडे न ठेवता हलकी वेणी बांधा. घराबाहेर पडण्यापूर्वी केसांना स्कार्फ किंवा दुपट्ट्याने झाकून ठेवा. यामुळे केस सुरक्षित राहतील. तसेच योग्य आहार, नियमित तेल मालिश, केसांचा मास्क आणि योग्य प्रकारे विंचरल्यास वाढ होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी