आरशात एखादा पांढरा केस दिसला की आपल्यापैकी अनेकांना वाटत तो सरळ उपटून टाकावा. पण अनेकजण असं मानतात एक पांढरा केस उपटला की त्याच्या जागी दोन ते तीन पांढरे केस येतात.(white hair myth) हल्ली वयाची विशी ओलांडली की अनेकांना आरशात पाहताना एक-दोन पांढरे केस दिसू लागतात.(white hair causes) घरातील इतर मंडळी आपल्याला सांगतात एक पांढरा केस उपटला तर दहा पांढरे केस येतात. पण हे कितपत खरं आहे.(premature white hair ) जर केस उपटायचे नसतील तर ते काळे करण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय करायला हवेत, पाहूया.
तज्ज्ञ सांगतात एका केसाचा पांढरेपणा हा दुसऱ्या केसावर अवलंबून नसतो. प्रत्येक केसांचा फॉलिकल मुळ वेगळे असते. जेव्हा केसातील मेलॅनिन अर्थात रंगद्रव्य संपतं तेव्हा केस पांढरा होतो. यामुळे एक केस तोडल्यानंतर दुसरा पांढरा होतो हा गैरसमज आहे. पण केस उपटल्याने टाळूला इजा होऊ शकते.वारंवार केस उपटल्याने तिथली मुळ कमकुवत होतात आणि त्या ठिकाणी केस येणं बंद होते. यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पण जर आपल्याला नैसर्गिकरित्या केस काळेभोर करायचे असतील तर आजीबाईच्या बटव्यातील हे खास उपाय करुन पाहा.
1. केस काळे करण्यासाठी मेहेंदी आणि कॉफीचा उपाय आपण करु शकतो. मेहंदीमध्ये कॉफी मिसळल्याने केसांना रंग सुधारतो. यामुळे केसांना काळा रंग मिळतो. यासाठी आपल्याला मेहेंदी पावडरमध्ये कॉफी पाण्यात मिसळून त्यात घाला. त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी केसांना लावा. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
2. चहा हे अनेकांचे आवडते पेय आहे. पण या चहा पावडरमुळे आपले केस काळे होऊ शकतात. चहा पावडरमध्ये टॅनिक अॅसिड असते जे केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग देते. एक कप पाण्यात चहा पावडर उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या. शाम्पू केल्यानंतर चहा पाण्याने केस धुवा. १० ते १५ मिनिटानंतर पुन्हा सामान्य पाण्याने केस धुवा.
3. आपल्या केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर आवळा आणि शिकाकाई हा उत्तम पर्याय आहे. या दोघांची पावडर समप्रमाणात घ्या. हे पाणी किंवा दह्यामध्ये मिसळून याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपण टाळू किंवा केसांना लावू शकतो. २५ ते ३० मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास आपल्याला फायदा होईल.
