Join us

केस सतत थोडे ट्रिम केले तर भरभर वाढतात? ब्यूटी एक्सपर्टचा सल्ला, केसांचं वाटोळं होतंच कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 14:35 IST

Hair growth after haircut: Does trimming hair make it grow faster: Hair trim for faster growth: केस सतत कापल्याने खरंच केसांची वाढ होते का? केस कापण्याचे फायदे काय? केस कधी ट्रिम करायला हवे. जाणून घेऊया या विषयी

केस आपल्या सौंदर्यात भर घालतात. ज्यामुळे आपण अधिक सुंदर दिसू लागतो.(Hair growth after haircut) मुलींना सुंदर, लांबसडक, काळेभोर केस फार आवडतात. परंतु, केस लांब आणि दाट ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.(Does trimming hair make it grow faster) केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने केसांना लावतो.(Hair trim for faster growth) अनेकदा केस वाढत नाही म्हणून आपण त्यांना सतत ट्रीम करतो किंवा विविध हेअर कट करतो.(Benefits of trimming hair regularly) ज्यामुळे आपले केस दाट आणि मजबूत होतात असं आपल्याला वाटते. केस सतत कापल्याने खरंच केसांची वाढ होते का?(How often should you trim hair) केस कापण्याचे फायदे काय? केस कधी ट्रिम करायला हवे. जाणून घेऊया या विषयी सविस्तर (Hair care tips for long hair)

पावसामुळे केसांचा पोत खराब-रखरखीत झाला? होममेड हेअर पॅक लावा, केस होतील सॉफ्ट-शायनी

इस्टांग्रामवर एका ब्युटिशियने केस कापण्याचे फायदे आणि हेअर कट कधी करावा याविषयी माहिती दिली आहे. खरेतर केसांच्या वाढीचा केस कापण्याशी काही संबंध नसतो. यासाठी आपल्याला योग्य आहार, कमी ताणतणाव, पुरेशी झोप आवश्यक असते. तसेच आहारात कॅल्शियम, प्रथिने आणि भरपूर पोषण तत्वांचा समावेश असायला हवा. ज्यामुळे केसांची वाढ होईल. केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण स्ट्रेस फ्री असणं देखील महत्त्वाचे आहे. ज्यामुळे आपली केस गळती थांबेल. पण अनेकदा केसांच्या मुळांना फाटे फुटतात किंवा ते अधिक रुक्ष होतात अशावेळी केस कापण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. केस कधी कापायला हवे पाहूया. 

केस किती वेळा कापावे? 

1. आपले केस लांब असतील तर दोन ते तीन महिन्यातून एकदा कापायला हवे. 

2. जर आपला शॉर्ट हेअर कट असेल दर ४ ते ६ आठवड्यातून केस ट्रिम करायला हवे. 

3. केसगळती प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर दीड ते दोन महिन्यानंतर केस ट्रिम करणे महत्त्वाचे आहे. 

केस कापण्याचे फायदे काय? 

1. केसांची कितीही काळजी घेतली तरी वारंवार केसगळती होत असेल तर केस कापयला हवे. यामुळे स्प्लिट एंड्स दूर होतात. तसेच केस तुटण्याची आणि त्यांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते. 

2. आपल्या केसांच्या पोत नुसार केस कापले तर त्यांची वाढ होण्यास मदत होते. तसेच केस निरोगी राहतात. 

3. बाहेरच्या प्रदूषणामुळे आणि केमिकल्स उत्पादनांचा केसांवर अतिरिक्त वापर झाला की, केस अधिक फ्रिजी होतात. अशावेळी आपण केसांना ट्रीम करणे फायदेशीर राहिल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी