लहानपणापासून आई आजी आपल्या केसांना भरपूर तेल लावून चंपी करायची. केसांना जास्त तेल लावले की ते तितकेच मजबूत आणि काळेभोर होतात, असं कायम सांगितलं जायचं. पण, सध्याच्या प्रदूषित वातावरणात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना एक विचित्र समस्या भेडसावते ती म्हणजे डँड्रफ किंवा कोंडा.(Does oil cause dandruff) अनेकजण कोंडा कमी करण्यासाठी केसांच्या मुळांना भरपूर तेल लावतात, तर काहींना असा अनुभव आला असेल की तेल लावल्यानंतर कोंडा अधिकच वाढतो.(Hair oiling for dandruff)
डर्मेटोलॉजिस्ट म्हणतात, तेल लावल्याने केस मऊ होतात. पण आपल्या डोक्यात आधीच डँड्रफ असेल, तर तेल लावणं केसांसाठी हानिकारक ठरु शकते. कोंडा हा मलासेझिया नावाच्या बुरशीमुळे (Fungus) होतो. जे आपल्या टाळूवरील नैसर्गिक तेलावर जगते.(How to remove dandruff) अशावेळी केसांना पुन्हा तेल लावल्याने कोंडा वाढतो. त्यासाठी केसांना तेल कधी लावावे, कसं लावावं हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
महागडी पैठणी नेसली की बोंगा दिसू नये म्हणून ५ टिप्स, १५ मिनिटांत नेसा पैठणी चापूनचोपून
आपल्याला कोंड्याचा त्रास असेल तर रात्रभर केसांना तेल लावणं टाळा. यामुळे टाळूवरील छिद्रे लवकर बंद होतात आणि घाण साचते. शाम्पू करण्याच्या केवळ १ ते २ तासांआधी केसांना तेल लावणं केसांच्या पोषणासाठी पुरेसे असते. कोमट तेल केसांना लावल्याने रक्ताभिसरण सुधारते.
नखांचा वापर न करता केवळ बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने ५-१० मिनिटे मसाज करा. केसांच्या लांबीनुसार आवश्यक तितकेच तेल केसांना लावा. खूप जास्त तेल केसांना लावल्याने ते काढण्यासाठी आपल्याला जास्त शाम्पू लावावा लागतो, ज्यामुळे केस कोरडे होतात.
जर आपल्या केसांत खूप जास्त कोंडा असेल तर केसांच्या मुळांना फक्त तेल लावा, टाळूला लावू नका. उन्हाळ्यात नारळाचे तेल तर हिवाळ्यात तिळाच्या तेलाचा वापर केसांसाठी करा. तेल लावण्यापूर्वी केस नीट विंचरुन घ्या. ज्यामुळे केस अधिक गळणार नाहीत. केसातील कोंडा घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय म्हणून खोबऱ्याच्या तेलात कडुनिंबाच्या तेलाचे काही थेंब घालून केसांना लावा. तेल लावल्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. केसांना रोज तेल लावण्यापेक्षा आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावायला हवे.
