सध्या लग्नसराईचा सिझन सुरु आहे. लग्नसराई असो किंवा मग खास प्रसंग, समारंभ, सणवार असो अनेकजणी हातांवर मेहेंदी काढतात. एखाद्या खास प्रसंगी हातांवर मेहेंदी हवीच... असं म्हणून आपण मोठ्या हौसेने हातांवर मेहेंदी काढतो. मेहेंदी काढल्याने आपल्या हातांच्या सौंदर्यात अधिक भर पडते(do you get allergy on hands after applying mehendi doctor told why this happens and how to treat allergicreaction to henna).
असे असले तरीही आपल्यापैकी बऱ्याचजणी अशा असतात की, ज्यांना मेहेंदी लावायला आवडते परंतु त्या मेहेंदी लावू शकत नाहीत. काहीजणींच्या बाबतीत मेहेंदी काढल्याने हातांवर पुरळ, फोड, रॅशेज येतात, इतकेच नाही तर हातांची त्वचा लाल पडते, सूज येते अशा अनेक समस्या सतावतात. आपण देखील अशा स्त्रियांपैकीच एक आहात, तर या समस्येवर डॉक्टर काय सांगतात (Real Vs Fake Henna) ते पाहूयात.
डर्माटॉलॉजिस्ट डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर सांगतात की, 'जर तुम्हालाही मेहेंदी लावल्यानंतर हातांमध्ये जळजळ, खाज किंवा अॅलर्जीचा त्रास होत असेल, तर हे तुमच्या त्वचेमुळे नसून चुकीच्या मेहेंदीमुळे असू शकते.'
आंबा खाऊन कोय फेकू नका! करा आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर - उन्हाळ्यातला उत्तम उपचार...
डॉक्टरांच्या मते, मेहेंदी लावल्यानंतर हातांवर अॅलर्जीची समस्या बहुतेकदा बनावट मेहेंदी किंवा रसायनांमुळे किंवा मेहेंदीमध्ये असलेल्या भेसळीमुळे होते. बनावट मेहेंदीमध्ये पीपीडी म्हणजेच पॅरा-फेनिलेनेडायमाइन नावाचे रसायन असते, ज्यामुळे त्वचेवर जळजळ, पुरळ, सूज किंवा खाज येऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये, त्याच्या अॅलर्जीचे चिन्ह तुमच्या त्वचेवर कायमचे राहू शकतात. अशा परिस्थितीत मेहेंदी लावताना नेहमी नैसर्गिक मेहेंदीचीच निवड करावी.
मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...
मेहेंदी असली आणि की भेसळ केलेली कशी ओळखावी ?
मेहेंदी असली आणि की भेसळ केलेली हे ओळखण्यासाठी डॉक्टर, टिश्यू पेपर टेस्ट करायला सांगतात. हातांना मेहंदी लावण्यापूर्वी ती टिश्यू पेपरवर लावा. थोडा वेळ मेहेंदी टिश्यू पेपरवर तशीच राहू द्यावी, नंतर मेहेंदी टिश्यू पेपरवरून पुसून घ्यावी. अस्सल आणि नैसर्गिक मेहेंदी हळूहळू ऑक्सिडायझेशन होऊन नारिंगी-तपकिरी रंगाची होते, तर बनावट मेहंदी टिश्यू पेपरवर लावल्यानंतर काही वेळातच काळी दिसू लागते. अशाप्रकारे हातांवर मेहेंदी लावल्यावर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा समस्या होऊ नये यासाठी मेहेंदी लावण्यापूर्वी ही टिश्यू पेपर टेस्ट नक्की घ्या...